अहमदनगर - जिल्हा वाचनालयाच्या वतीने ‘लेखक तुमच्या भेटीला’ या उपक्रमांतर्गत सुप्रसिद्ध लेखक, साहित्यीक माधव मनोहर जोशी (मुंबई) व कवियत्री सायली देशपांडे यांच्याशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दि. ७ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता जिल्हा वाचनालयाच्या लोकमान्य टिक सभागृह, चितळे रोड, नगर येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी वाचक-रसिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन वाचनालयाच्या वतीने केले आहे.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष शिरिष मोडक, प्रमुख कार्यवाह विक्रम राठोड, उपाध्यक्ष अनंत देसाई, दिलीप पांढरे, खजिनदार तन्वीर खान, सहकार्यवाह डॉ. राजा ठाकूर, सदस्य अनिल लोखंडे, मेधा काळे, राहुल तांबोळी, हे प्रयत्नशील आहेत.
तसेच किरण आगरवाल, अजित रेखी, शिल्पा रसाळ, ज्योती कुलकर्णी, संजय चोपडा, डॉ. शैलेंद्र पाटणकर, निमंत्रित सदस्य चंद्रकात पालवे, गणेश अष्टेकर, गौरी जोशी आदी प्रयत्नशील आहेत.