अहमदनगर - शेवगाव येथील रेसिडेन्शिअल जुनियर कॉलेजमधील विज्ञान शाखेतील विद्यार्थिनी पूजा बाळासाहेब अकोलकर हिने यशाला गवसणी घातली आहे. बारावीच्या परीक्षेत ९२.१७ टक्के मार्क घेऊन तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या यशाचे श्रेय तिने तिच्या शाळेतील शिक्षक, आई-वडील यांना देले आहे. प्राध्यापक प्रवीण भाऊसाहेब अकोलकर, प्राध्यापक ज्योती प्रवीण अकोलकर माझ्या चुलत्या चुलतीकडूनच शिक्षणाचे बाळकडू मला मिळाले. त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करत माझ्या यशात त्यांचा मोलाचा वाटा आहे, असे पुजाने सांगितले. तिच्या यशाबद्दल बोधेगाव परिसरात तिचे कौतुक होत आहे.