भारताच्या इतिहासातील 'तो' काळाकुट्ट दिवस..

आदरणीय राजीवजी, सादर प्रणाम.
२१ मे १९९१ हा दिवस भारताच्या इतिहासातील काळाकुट्ट दिवस.. आपण २० मे रोजी १० जनपथवरुन सोनियाजी आणि मुलांचा निरोप घेऊन भुवनेश्वरला गेलात. तेही विमान स्वतः चालवत. हवामान खराब असतानाही आपण भुवनेश्वरी गेलात. आपल्याला मृत्यूची चाहूल बोलावतं होती का?

राजीवजी आपण अवघ्या चाळीसव्या वर्षी इंदिराजींच्या मृत्युनंतर भारताचे सर्वात तरुण पंतप्रधान झालात. राजीवजी आपणास आधुनिक माहिती क्रांतीचे जनक म्हटले जाते. आधुनिक विचार... कठोर निर्णय यामुळे आपली जागतिक राजकारणामध्ये भारताला वेगळीच ओळख दिलीत.

आपण आपलं बालपण आपले आजोबा देशाचे पहिले पंतप्रधान नेहरुजींच्या सोबत घालवले. पिता फिरोज गांधी एक यशस्वी आणि निर्भय खासदार होते. निर्भयता आपल्याकडे आईवडिलांची देणगी होती.

राजीवजी, आपले शालेय शिक्षण वेल्हम देहरादून आणि हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या दून निवासी शाळेत झाले.तिथे संजय आणि आपल्याला आयुष्यभराचे मित्र मिळाले. नंतर लंडनस्थित  इम्पिरियल महाविद्यालयात आपण मेकॅनिकल इंजिनियरिंगचे शिक्षण घेतलेत. आपल्याला पाश्चात्त्य आणि हिंदुस्थानी शास्त्रीय  संगीत आवडत असे.

आपण उत्तम छायाचित्रण करत होतात. प्रवासात ड्रायव्हिंग करत रेडिओ ऐकायला आवडत असे. राजीवजी आपणास विमान उड्डाणात आपल्याला अतिशय आवड होती. त्यामुळेच आपण इंग्लडहून परतताना त्यांनी दिल्ली फ्लाइंग क्लबची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केलीत आणि आपल्याला व्यावसायिक वैमानिकाचे अनुज्ञप्ती पत्र मिळवलेत.

आणि लगेचच आपण इंडियन एयरलाईन्सचे देशांतर्गत सेवेसाठी वैमानिक बनलात. सन 1965 ला सोनियाजी आपल्या आयुष्यात आल्या. 1968 साली अभिताभजी यांच्या घरी आपला विवाह झाला, असं म्हणतात. अभिताभजीच्या मातोश्री तेजी बच्चनजी यांनी सोनियांचे कन्यादान केले होते. कारण इंदिराजी आणि तेजीजी खूप जवळच्या मैत्रिणी होत्या.

आपली वैमानिकाची नोकरी खाजगी कौटुंबिक जीवन शांतपणे घालवत होतात. राजीवजी हे नियतीला जणू मान्य नव्हते वाटतं. 1980 एका विमान अपघातातील आपले बंधू संजयजींच्या मृत्युनंतर आपल्याला राजकारणप्रवेश करावा लागला होता. कदाचित आपण मनाविरुध्द आला होतात का राजकारणात.!

त्यानंतर आपण बाह्य आणि अंतर्गत आव्हानांना तोंड देत होता. 1982 ला अमेठीतून पोटनिवडणूक आपण जिंकलीत. लगेचच नोव्हेंबरमध्ये  भारताने आशियायी क्रिडास्पर्धेचे यजमानपद घेतले होते. त्यावेळी अत्यंत यशस्वीरित्या क्रिडासंकुल उभे करणे, इतर पायाभूत सुविधा या सर्वांचीच जबाबदारी आपण
अतिशय दक्षतेने सहज आव्हानात्मक काम पूर्ण केले.

त्यावेळी आपण काँग्रेसचे सरचिटणीसपद अत्यंत तन्मयतेने काम करत होतात. पक्षाला या काळात आपण मजबूत केले.. आणि... 31आक्टोबर 1984 इंदिराजींच्या क्रुर हत्येनंतर काँग्रेसचे अध्यक्ष आणि देशाचे पंतप्रधान झालात. आईच्या वियोगाचे प्रचंड दुःख बाजूला ठेवून आपण संयमाने राष्ट्रीय जबाबदारी पार पाडलीत.

आपण महिन्याभरात पृथ्वीच्या परिघाच्या दिडपट अंतराची यात्रा करत देशातील सर्व भागात जाऊन आपण 250 पेक्षा जास्तच सभा घेतल्यात. आपण गंभीर होतात.. पण आपलं व्यक्तिमत्त्वं आधुनिक विचार व अदभूत निर्णयशक्ति असलेलं होतं. आपलं मत होत की भारताला एकसंघ ठेवण्याबरोबर एकविसाव्या शतकातील आत्मनिर्भर भारत निर्माण करणे..

त्यादृष्टीने आपण देशाची वाटचाल ठेवली होती. देश संगणकाच्या क्रांतीकडे वाटचाल करत होता. आज सर्वांच्या हातात हा भ्रमणध्वनी दिसतोय हे केवळ आपल्या दूरदृष्टीमुळेच. आपल्या माणुसकीच्या गोष्टी अनेक आहेत.

वाजपेयीजी एकदा आजारी होते. आपण त्यांना भेटायला गेलात व अडवाणीजींना म्हणालात, "वाजपेयीजींना उपचारांसाठी अमेरिकेला घेऊन जा, सगळा खर्च भारत सरकार करेल." आणि त्याप्रमाणे केलतही. बरं याची वाच्यता किंवा श्रेय घेणे कधीही केलं नाहीत...!

राजीवजीं, हल्ली काम कमी अन् गाजावाजाच जास्त असं आहे. आताच्या सूडाच्या राजकारणात आपली सहृदयता आठवते. आपण कधीही पातळी सोडून विरोधकांना धारेवर धरलं नाहीत. हा सुसंस्कृतपणा हल्ली अभावानेच आढळतो..!

भुवनेश्वरहून चेन्नईला जाणार विमान नादुरुस्त होतं. आपण परत विश्रामगृहाकडे गेलात. अर्ध्या तासात विमानदुरुस्तीचा निरोप मिळाल्यावर वेळेत सभेला जायचं म्हणून घाईघाईने पुढे गेलात. काही सुरक्षाकर्मी मागे राहिले. पेरुबंदरला पोहचलात..

क्रुर वर्मा शिव आणि नलीनी यांनी धनु नामक मनुष्यबाँम्ब आपल्याला मारण्यासाठी तयार ठेवला होता. सुरक्षाकर्मी अनु धनुला आपल्या जवळ येऊ देत नव्हती तर आपण अनु सुहास्यवदनाने हाताने थांबवलत.. ते आपलं मनमोहक हसू आपल्याबरोबरच संपून गेलं.

आपली मुलं आणि पत्नी यांनी आपल्या मारेकऱ्यांना क्षमा केलीय. ही ताकत.. हे चांगुलपण स्वभावात यायला 'गांधी' असावं लागतं हेच खरं. लोकांच्यात मिसळून त्यांची दुःख जवळून पाहणं हेच कुंटूबप्रमुख म्हणून आपण शेवटपर्यंत केलत.

देशासाठी आपण शहिद झालात.
देश आपल्याला  कधीच विसरणार नाही..! राजीवजी आपणास विनम्र वंदन.

- स्वप्नजा घाटगे (कोल्हापूर)

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !