अहमदनगर - राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप समर्थक पै. अंकुश चत्तर यांचा शनिवारी रात्री निर्घृण खून झाला. त्या रात्री घडलेला हत्याकांडाचा थरार पोलिस तपासात सविस्तरपणे समोर येत आहे.
दि. १५ जुलै २०२३ रोजी आदित्य गणेश औटी याचे काही मुलांशी भांडण झाले होते. पै. अंकुश चत्तर ही भांडण सोडवण्यासाठी आला असता ७ ते ८ जणांनी काळे रंगाचे कार मधुन आले. भाजप नगरसेवक स्वप्निल शिंदे याने पुर्ववैमनस्यातुन दिलेल्या चिथावणीवरुन त्यांनी अंकुश यास बेदम मारहाण केली.
जीवे ठार मारण्याचे उद्देशाने हातातील लोखंडी रॉड, काचेच्या बाटल्या, वायर रोप व गावठी कट्टा घेवुन जोराजोरात आरडा ओरडा व दहशत निर्माण केली. तसेच रस्त्याने येणारे जाणारे लोक व दुकानदार यांचेवर धाक निर्माण करुन अंकुश चत्तर याचे डोक्यात लोखंडी रॉडने मारुन गंभीर जखमी केले.
अंकुश चत्तर बेशुद्ध झाल्यानंतर मारेकरी निघून गेले. मात्र पाईपलाईन रोडवरील एका वाइन शॉपीसमोरून ते पुन्हा माघारी वळले. पुन्हा परतल्यावर नगरसेवक शिंदे याने अंकुश जिवंत आहे का, याची खात्री करायला सांगितली. तसेच 'अंकुश चत्तर गेला नसल्यास त्याला संपवून टाक', असे सांगितल्याचे पोलिस चौकशीत समोर आले आहे.
या घटनेबाबत बाळासाहेब भानुदास सोमवंशी (वय ४२, रा. वांबोरी, ता. राहुरी, हल्ली रा. गावडेमळा, पाईपलाईन रोड, अहमदनगर) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. खून, भारतीय हत्यार कायदा कलमाप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
अंकुश चत्तर उपचारादरम्यान मयत झाल्याने गुन्ह्यास ३०२ हे वाढीव कलम लावले आहे. ही घटना गंभीर स्वरुपाची व संवेदनशील असल्याने पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना समांतर तपास करुन फरार आरोपींना अटक करणेबाबत आदेश दिले होते.
त्यानुसार तीन वेगवेगळी पथके तयार करुन फरार आरोपींचा सीसीटीव्ही फुटेज पाहुन, आरोपींची ओळख पटवुन, तांत्रिक विश्लेषणाचे आधारे तपास करुन वाशिम येथे जावून स्वप्निल रोहिदास शिंदे, अक्षय प्रल्हादराव हाके, अभिजीत रमेश बुलाख, महेश नारायण कुर्हे, सुरज ऊर्फ विकी राजन कांबळे, यांना ताब्यात घेतले.
त्यांची अधिक विचारपुस करून त्यांना कार व त्यांचे मोबाईलसह ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयात हजर केले असता कोर्टाने त्यांना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. या गुन्ह्याचा अधिक तपास तोफखाना पोलिस करीत आहेत.