किरीट सोमैय्या आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणी रुपाली चाकणकर यांचे पोलिसांना 'हे' निर्देश


मुंबई - भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ माध्यमांवरून प्रसारित झाला आहे. विविध सामाजिक संस्थाकडून या व्हिडिओबाबत महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयास विचारणा होत आहे.

त्यामुळे ऍक्शन मोडमध्ये येत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी गंभीर दखल घेतली आहे. याबाबत त्यांनी मुंबईच्या पोलिस आयुक्तांना याबाबत लेखी पत्राद्वारे थेट निर्देश दिले आहेत.

महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम १९९३ अंतर्गत कलमानुसार महाराष्ट्र राज्य महिला आयोगास स्त्रियांच्या तक्रारी विचारार्थ स्विकारणे, आधी त्या बाबींची स्वाधिकारे दखल घेणे याकरिता प्राधिकृत करण्यात आले आहे.

त्यानुसार किरीट सोमय्या यांच्या आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरणी चौकशी करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयास तात्काळ सादर करावा, असे निर्देश मुंबई पोलिस आयुक्तांना देण्यात आले आहेत.

काय आहे आक्षेपार्ह व्हिडिओत - भाजप नेते किरीट सोमय्या यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ एका खासगी वृत्तवाहिनीने प्रसारित केला आहे. त्यात सोमय्या हे अत्यंत आक्षेपार्ह स्थितीत दिसून येत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

राजकीय वातावरण तापले - किरीट सोमैय्या यांचा आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रातील राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे. काँग्रेस, शिवसेना आदी पक्षांच्या महिला आघाडीने ठिकठिकाणी निदर्शने करुन कारवाईची मागणी केली.

सोमैय्या यांच्यावर टीकेची झोड - आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोमैय्या यांच्यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. तसेच विविध संघटना व नेत्यांकडून महिला आयोगाने या घटनेची तत्काळ दखल घेत कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

किरीट सोमैय्या म्हणतात - या आक्षेपार्ह व्हिडिओत आपण नसून तो मॉर्फिंग केलेला असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशी करून याबाबत कारवाई करण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे. सोशल मीडियावर तसे पत्र त्यांनी प्रसारित केले आहे.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !