नात्यांच्या गर्दीत स्वतःला कधी तुझ्या कोषात डोकावूंन पाहिलंच नाहीस.. कधी स्वतःशी बोलला नाही की हितगुज नाही.. एकदा स्वतःला वेळ तर देऊन बघ, कितीतरी दिवसांत तु तुझ्याशी बोलला देखील नाहीस. अपेक्षा तरी काय असतात अशा तुझ्या तुझ्याकडून..?
थोड शांत बसावं माझ्याजवळ, तुझ्या कपाळावरचा घाम तरी पुसता येईल मला फुंकर घालता येईल हळुवार.. एव्हाना सारी गर्दी असतेच ना तुझी, डोळ्यातील पाणी सुकून गेल्यावरही भानावर येतं नाहीस...
होईल रे मैदान रिकामं कधीतरी, एकटा असशील तेव्हा.. बेरीज वजाबाकीच्या खेळात आकाशही मोकळं असेल.. बोल माझ्याशी, फिरवू दे बोटे तुझ्या केसांवरून... जखमांना पडलेली खपली, अन् जगण्याचे संदर्भ हरवून बसलेली तुझी दुभंगलेली आशा...
- जयंत येलुलकर (अहमदनगर)