अहमदनगर - येथील प्रसिद्ध ख्यातनाम लावणी सम्राज्ञी व अभिनेत्री आरती काळे याना महाराष्ट्र जर्नलिस्ट फाउंडेशनचा भास्कर पुरस्कार मिळाला आहे. नुकताच दिनांक २६ मे रोजी दीनानाथ मंगेशकर कला अकॅडमी, पणजी येथे हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला आहे.
यावेळी प्रमुख अतिथी माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे, पद्मश्री विनायक खेडेकर, श्रीपाद नाईक, रमाकांत खलप, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, राजतीलक नाईक, पद्मश्री संजय पाटील, नलिनी (दिदी) पोतदार, राजीव लोहार, आदी मान्यवर उपस्थित होते.
आरती काळे-नगरकर या लावणी सम्राज्ञी व अभिनेत्री आहेत. त्याचे कथक व भरत नाट्यम हे शास्त्रीय शिक्षण झालेले आहे. त्यांनी महाराष्ट्र मंडळ (दुबई) मध्ये, जपान, इंडोनेशिया, रशिया, आदी ठिकाणी आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक कार्यक्रम सादर केलेले आहेत.
त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. यामध्ये अकलूज लावणी महोत्सव, हॅट्रिक (अकलूज), आई महोत्सव,महाराष्ट्र शासन, कलानिकेतन, नाट्य परिषद मुंबई, कानुश्री आनंदयात्री धुळे, संगीत नाट्य अकादमी, बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार (दिल्ली), महालक्ष्मी माता पुरस्कार (पुणे) आदींचा समावेश आहे.
तर लावणी महोत्सव नाशिक, पुणे फेस्टिव्हल (पुणे), वेरूळ महोत्सव (वेरूळ), राजभवन लावणी कार्यक्रम (मुंबई), महाराष्ट्र राज्य लावणी महोत्सव (मुंबई), ठाणे महोत्सव (ठाणे), साहित्य संमेलन (मुंबई), दिल्ली महोत्सव, आग्रा महोत्सव, चेन्नई कार्यक्रम, प्रजासत्ताक दिन २०११, नवी दिल्ली चित्ररथ संचलन, जत्रा-कार्निवल मराठी महोत्सव (भोपाळ), आदी ठिकाणी त्यांनी कार्यक्रम सादर केले आहेत.
तसेच चित्रपटात त्यांनी काम केले असून अनेक टीव्ही चॅनलवर कार्यक्रम व सहभाग घेतला आहे. आता नुकताच त्यांना भास्कर पुरस्कार मिळाल्याबद्दल अनेकांनी त्याचे अभिनंदन केले आहे.