रयतेचा देव - आपला लाडका बाप्पा (पूर्वार्ध)


मानवाचा जन्म तसा अर्वाचीनच आहे, अर्थात हे कुणीही मान्य करेलच. मानवाचा विकास आणि मानवी जगण्याची उत्क्रांती होत असताना निसर्गाच्या अजस्त्र शक्ति पुढे मानव नतमस्तक झाला असला पाहिजे.

पृथ्वीवरील सारे प्राणी अर्थातच त्यांचे मित्र झाले मात्र सहकारी झाला तो हत्ती.! त्यांचे स्तंभ सदृश पाय, मोठे पोट, बारीक पण तीक्ष्ण डोळे.. त्याचे सतत हलणारे कान ती लांब सडक सोंड विशाल पाठ ते नितांत सुंदर दिसणारे दातांचे सुळे.

भला मोठा थोरला भालप्रदेश, एवढेच नव्हे तर सर्वांगाला असणारा मातकट काळा रंग निसर्गाची ही निर्मिती माणसाच्या तुलनेत अजस्त्र खरी पण पण ती स्वभावाने शांत, आज्ञाधारक, शाकाहारी आणि वाहतुकीला उपयुक्त असणारी.

लहान लहान टोळ्या करून राहणाऱ्या माणसाला ही हत्तीची उपयुक्तता जाणवली आणि दुसरीकडे तिच्या शक्तीचे भयही दाटून आलं. आपल्या टोळीच्या पुढे अग्रभागी हत्तीला पुढे ठेवून माणूस प्रवास करू लागला. पुढे या मानवी टोळ्यांना गण (गट) ही संज्ञा प्राप्त झाली.

हस्तिनापूर हे नांव त्या प्रदेशातील हत्तीच्या मोठ्या संख्येने प्राप्त झाले होते. आपल्याकड हत्तीच्या  निवासाची वनेच्या वने होती. महाभारतात उल्लेख असणारे वारणावत (वारणम्हणजे हत्ती) हे वन त्याचे ठळक उदाहरण होय. असे गजराज आणि त्या गणांचे नेतृत्व करणारा तो गणपती !

इथे कुठतरी सामर्थ्यवान हत्ती आणि आपल्या टोळीचा शक्तीशाली प्रमुख या दोहोंच्या प्रतिमेतील हा दोहोंच्या प्रतिमेतील साम्य एकरूप झाले. आणि तत्कालीन मानवाच्या अनाघ्रात कल्पना शक्तीला एक गोजीरे स्वप्न पडले. त्याने बेढव मानव शरीर आणि शक्तीशाली हतीचे तोंड यांचा संयोग घडवून आणला, आणि गजमुखधारी गणेशाने जन्म घेतला. प्राचीन गुहात गणेशाची असंख्य शिल्पे आहेत.

केवळ भारतातच नव्हे तर इंडोनेशिया, जपान, नेपाळ, फिलीपीन्स, अफगाणिस्तान या अन्य देशांसह सर्व त्र प्रिय होता या अर्थाने गणपती हा रयतेचा देव आहे. पुढे काळाच्या पायऱ्या पुढे जात असताना गणपतीची नादमधुर संस्कृत स्तोत्रे रचली गेली.

तू सृष्टीचा मूलाधार आहेस, असे सर्वोच्च प्रशस्ती, स्तुती तत्कालीन प्रस्थापित विद्वान ऋषीनी दिली असली तरीही.. मुळात गणपतीचे दैवतीकरण व प्रथमतः अधोरेख केले ते सर्वसामान्यांनी हे आपण लक्षात घेतले पाहिजे...!

साधसुधं रूप खूप कलाकुसर नाही, रेखीव नाही, सहज उपलब्ध असणारा आणि घरातलाच एक असणारा. रयतेचा ह्या देवाच्या स्मरणाशिवाय सामान्या पासून देवापर्यंत कुठलही कार्याची सुरवात होत नाही.

अगदी आर्षकाळापासून जनमानसात रुजलेल्या या गणपती बद्दलच्या आदरभावाला साद घालण्यासाठी लोकमान्यानी सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला असेल. गणपती हा सोळा विद्या आणि 64 कलांचा अधिपती आहे. पृथ्वीवर गणपतीला अज्ञात असे काहीही नाही, हे आपल्याला माहिती आहेच.

क्रमशः

- स्वप्नजाराजे घाटगे (कोल्हापूर)

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !