रयतेचा देव : लाडका गणराय (उत्तरार्ध)


मानवाने कल्पिलेला हा पहिलावहिला समूर्त आणि सावयव देव असावा आणि म्हणूनच आजही आपण कुठल्याही शुभकार्याची, ग्रंथ लेखनाची, नाट्यप्रयोगाची, नृत्याविष्काराची, गायनावादनाची, छपाईची, चित्रकलेची सुरवात गणेशवंदनानेच होते.

ज्ञानदेवंपासून ते सामान्य नागरिकापर्यंत गणेशपूजनाने आपल्या कार्याची सुरवात करतात.. यातच गणपतीचे रयतेचं असणं अधोरेखित होते.!

आपण गणपतीला विघ्नहर्ता म्हणतो, पण आदिवासीज्ञातीमध्ये गणपती आपल्या वेदनेवर आपल्या सोडेने फ़ूंकर घालतो अशी नितात श्रध्दा आहे. गणपती कुठेही दिसतो, कुणाला झाडाच्या बुध्यात दिसतो, कोण कलाकार तादळाच्या दाण्यावर कोरतो, सखी रांगोळीत नुसत्या रेषंने गणपती साकारते..!

अशा या रयतेच्या देवाने महर्षी वेदव्यासाचा लेखनिक म्हणून काम केले अशी कथा आहे, यातच आपल्या बाप्पाचे साधेपण आहे. सलग रात्रंदिवस व्यासमहर्षी सागत होते, गणेशजी लिहीत होते.

या सर्वामुळे गणेशजीच्या शरीराचे तापमान वाढू नये म्हणून व्यासानी गणपतीच्या शरीरावर मातीचे लेपण केले. आणि यामुळे गणपती आखडून गेला म्हणून त्याना 'पार्थिव गणेश' असे नाव पडले.

दहा दिवसानंतर व्यासानी गणपतीला जवळच्या कुडात डुबकी घ्यायला लावली. अशी मान्यता आहे की, गणपती गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यत सगुण साकार रूपात या मूर्तीत स्थापीत रहातात. ज्याला गणपती उत्सवाच्या दरम्यान स्थापित केले जाते.

यावेळी सामान्यापासून श्रीमंतापर्यत लोक बाप्पाला आपल्या अडचणी सांगत असतात. त्या ऐकता ऐकता बाप्पा एवढे गरम होत असतील की चर्तुदशीला शितल वाहत्या पाण्यात विसर्जित करुन त्यांना शितल करण्याचा प्रयत्न असतो. हे प्रतिकात्मक असते हे तुम्हाआम्हाला माहित आहेच.

अलिकडे या सणाला मोठे चमत्कारीक रुप आले आहे, की जेवढा मोठा गणपती तेवढा आनंद, ही संकल्पना जणू रुजू झाली आहे. आता प्रत्येक गल्लीत एक भला मोठा मांडव, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, मोठ्या आवाजात कर्कश वाजणारी गाणी, लेजरने होणारे डोळ्यांचे नुकसान.

आपण कुठल्या दिशेने चाललो आहोत याचे आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. यानंतर लगेचच येणारा, दुर्गोत्सोव मलातर काळजीत टाकणारा आहे. गणपती जसा सामान्यांचा, रयतेचा देव आहे, जशी विठुमाऊली तसा हा आपलातुपला बाप्पा.

झोपडीपासून महालात तेवढ्याच सहृदयतेने रमणारा. होय ना मंडळी, तुम्ही सहमत आहात का.?

- स्वप्नजाराजे घाटगे (कोल्हापूर)

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !