अहमदनगर - नेवासे तालुक्यातील घोडेगाव येथील श्री घोडेश्वरी सामाजिक प्रतिष्ठान व घोडेगाव ग्रामस्थांच्या संयुक्त वतीने ‘बाप म्हणजे काय?’ या विषयावर दि. २४ सप्टेंबर रोजी सकाळी प्रा. डॉ. वसंत हंकारे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
हे व्याख्यान मंगळवारी, दि. २४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता श्री घोडेश्वरी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित केले आहे.
कुटुंबासाठी झटणारा बाप जीवनामधे अनेक संकटांना तोंड देत कुटुंबांच्या गरजा भागवत असतो. कुटुंबासाठी अनेक वेदना सहन करत समाजात सुखी कुटुंबाची, संसाराची स्वप्नं रंगवतो. पण त्याच कुटुंबातील अनेकांना ‘बाप’ पुर्ण समजलेला नसतो.
त्यामुळे विशेषत: मुलांना ‘बाप’ काय असतो, हे अत्यंत हळव्या आणि भावुक शैलीत मराठमोळ्या व कौटुंबिक भाषेत प्रा. वसंत हंकारे हे व्याख्यानाच्या माध्यमातून उलगडून सांगणार आहेत. व्याख्यानानंतर विद्यार्थी व पालकांना जेवणाची व्यवस्था केलेली आहे.
विशेषतः इयत्ता सातवी ते बारावीचे विद्यार्थी असलेल्या पालकांसह सर्व ग्रामस्थांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन श्री घोडेश्वरी सामाजिक प्रतिष्ठान व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.
श्री घोडेश्वरी सामाजिक प्रतिष्ठानचा कौतुकास्पद उपक्रम : घोडेगाव येथील श्री घोडेश्वरी सामाजिक प्रतिष्ठान सामाजिक कार्यात एक दशकाहून अधिक काळापासून कार्यरत आहे. यापूर्वी सिंधुताई सपकाळ यांचेही व्याख्यान घेतले होते. आता प्रा. हंकारे यांचे व्याख्यान आयोजित केले आहे.