पालिकेमध्ये क्रीडा व सांस्कृतिक समितीचा सभापती असताना पालिकेच्या वतीने पालिका सभागृहात पु. ल. देशपांडे यांचा जन्म दिवस पुलंच्या आठवणींनी तसेच साहित्यिक उपक्रमांचे आयोजन करीत साजरा केला होता.
विविध सामजिक,सांस्कृतीक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांचे अनेक छोटे, मोठे सोहळे या म्युनिसिपल कौन्सिल हॉल मध्ये नेहमी होत असत. जुन्या पालिकेतील हे ऐतिहासिक सभागृह म्हणजे जुन्या वैभवाचे, कलात्मकतेचे सुंदर उदाहरण होते.
पालिका (म्युनिसिपल कौन्सिल) जेंव्हा अस्तित्वात आली, तेव्हापासून राष्ट्रीय पातळीवरील दिग्गजांच्या उपस्थितीत या सभागृहात अनेक सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन झाले आहे.
याच कौन्सिल हॉलमध्ये पालिकेच्या सर्वसाधारण सभा होत असत, शहर विकासाचे अनेक महत्वाचे निर्णय येथेच झाले आहेत. अशा सुंदर क्षणांची साक्षीदार असलेली ही वास्तू अर्थात कौन्सिल हॉल सात, आठ वर्षांपूर्वी लागलेल्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
त्यामध्ये हे अनमोल सभागृह जळून खाक झाले. नामवंत चित्रकारांनी काढलेली राष्ट्रीय नेत्यांची, पालिकेच्या सुरुवातीच्या नगराध्यक्षांची तैलचित्रे जळाली. आज हे सभागृह तशाच भग्नावस्थेत, दुर्लक्षितपणे उभे आहे.
ही वैभवशाली वास्तू म्हणजे महापालिकेची अनमोल संपत्ती आहे. या सभागृहास आपले गतवैभव प्राप्त व्हावे.. तर नगरकर महापालिकेस दुआ देतील.
- जयंत येलुलकर (अध्यक्ष, रसिक ग्रूप)