येथे क्लिक करुन आमचे यु ट्युब चॅनल सबस्क्राईब करा
अहिल्यानगर - सारसनगरमधील ‘ग्रीन स्पार्क प्री स्कूल’मध्ये ‘इलेक्ट्रॉनिक उपकरण’ या थीमवर विज्ञान प्रदर्शन पार पडले. चिमुकल्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या कल्पना शक्तीची चुणूक दाखवली. त्यांनी सादर केलेले विविध प्रकल्प पाहून पालक वर्ग अवाक झाले.
बालकांमध्ये विज्ञानाची जिज्ञासा वाढून त्यांच्यातील कला कौशल्यांना चालना देण्याच्या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात मुलांनी स्मार्ट वॉच, हेअर ड्रायर, हेलिकॉप्टर, कॅलक्युलेटर, मायक्रोवेव्ह ओव्हन, एटीएम मशीन, रोबोट, एलईडी बल्ब, लॅपटॉप, मोबाईल, रेफ्रिजरेटर, सीसीटीव्ही कॅमेरा, ब्ल्यू टूथ डीव्हाईस यांसारख्या उपकरणांचे प्रकल्प सादर केले होते.
बालसंशोधकांनी उपकरणांची कार्यप्रणाली, उपयोग आणि त्यांचे महत्त्व विशद केले. श्री विद्या निकेतनचे प्राध्यापक राहुल कुलकर्णी यांनी या प्रदर्शनाची पाहणी केली. तर त्यांनी विद्यार्थ्यांची उत्साही कार्यशैली पाहून व विद्यार्थ्यांच्या विविध प्रकल्पाचे कौतुक केले. मुलांमधील आत्मविश्वास आणि त्यांचा उत्साह पाहून त्यांच्याशी हसत खेळत संवाद साधला.
प्राध्यापक कुलकर्णी म्हणाले, ग्रीन स्पार्कच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव देण्याचे काम केले जात आहे. विद्यार्थ्यांना फक्त पुस्तकी ज्ञान न देता, प्रत्यक्षात त्यांना कौशल्यक्षम शिक्षणातून घडविले जात असल्याचे सांगितले. तर प्री स्कूलच्या संचालिका हेमलता पाटील व शिक्षकांचे त्यांनी कौतुक केले.
सहशिक्षिका योगिनी गाडळकर आणि दुर्वा पाटील यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. या प्रदर्शनात पालकांसह आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले.