येथे क्लिक करुन आमचे यु ट्युब चॅनल सबस्क्राईब करा
अहिल्यानगर - श्री बाणेश्वर शिक्षण संस्थेचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय बुऱ्हाणनगर, येथे इतिहास विभागांतर्गत शिवजयंती निमित्त शिवव्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख व्याख्याते समाज प्रबोधनकार दत्ता कुलट यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवचरित्रावर व्याख्यान दिले.
त्यात त्यांनी वेळेचे व्यवस्थापन, आत्मविश्वास, ध्येय, आजच्या जीवनाशी शिवचरित्राचा संबंध जोडून विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. समाजात आजही शिवाजी महाराजांची शिकवण दिली जाते. त्यांचे अनुसरण आजची पिढी मोठ्या प्रमाणात करते, अशा प्रकारचे प्रबोधन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही.एम. जाधव, आयक्यूएसी कॉर्डिनेटर डॉ. आर. एच. शेख, इतिहास विभाग प्रमुख डॉ. सुजाता सोनवणे आणि तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आर. बी. शिंदे यांनी केले. तर प्रा. एस. के. कोहक यांनी आभार मानले. विद्यार्थ्यांना या व्याख्यानातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आदर्श राज्यकारभाराचे धडे मिळाले.