वर्षा भोईटे यांना 'शब्दगंध राज्यस्तरीय शैक्षणिक कार्यगौरव' पुरस्कार

येथे क्लिक करुन आमचे यु ट्युब चॅनल सबस्क्राईब करा

भगवान राऊत (अहिल्यानगर) - महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि शब्दगंध साहित्यिक परिषद आयोजित सोळावे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच अहिल्यानगर येथे मोठ्या दिमाखात संपन्न झाले. संमेलनाच्या समारोपप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांना तसेच साहित्यिकांना सन्मानित करण्यात आले. 

याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेच्या संतुकनाथ विद्यालय, जेऊर येथील शिक्षिका वर्षा भोईटे यांना शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय शैक्षणिक कार्य गौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

संमेलनाध्यक्षा सुप्रसिद्ध कवयित्री संजीवनी तडेगावकर यांच्या हस्ते तसेच विचारपीठावरील मान्यवर संमेलनाचे स्वागताध्यक्ष संपतराव बारस्कर, सुप्रसिद्ध लेखक संजय कळमकर, पारनेरच्या आमदार काशिनाथ दाते, न्यू आर्ट्स कॉलेजचे प्राचार्य बाळासाहेब सागडे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे किशोर मरकड, किरण बारस्कर, पंडितराव तडेगावकर, कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे, शब्दगंधचे संस्थापक सचिव सुनील गोसावी, अध्यक्ष राजेंद्र उदागे, माजी नगरसेवक श्रीनिवास बोज्जा आदी उपस्थित होते.

विविध शैक्षणिक उपक्रमातील सहभाग, संवेदनशील कवयित्री म्हणूनही प्रसिद्ध आहेत पुरस्काराच्या रूपाने पाठीवर कौतुकाची थाप पडल्याने सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे. रयत शिक्षण संस्था उत्तर विभागाचे विभागीय अधिकारी बोडखे साहेब, माजी उपविभागीय अधिकारी वाळुंजकर साहेब, विद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य भोर मॅडम, रयत शिक्षक मित्र परिवार तसेच स्थानिक स्कूल कमिटी, जेऊर (बा) यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !