येथे क्लिक करुन आमचे यु ट्युब चॅनल सबस्क्राईब करा
नाशिक : पाथर्डी गावाजवळील धोंगडेनगर
येथील रहिवाशी पाण्याअभावी तहाणले असून गेल्या चार ते पांच महिन्यांपासून त्यांच्या घशाला कोरड पडली
आहे. पाण्यावाचून मुला-बाळांचे, घर-परिवाराचे होणारे हाल थांबविण्यासाठी येथील रहिवाशी
पाण्याच्या मागणीसाठी महानगर पालिकेच्या सिडको विभागीय अधिकाऱ्यांच्या ऑफिसचे उंबरे
झिजवत आहेत, मात्र निर्ढावलेल्या यंत्रणेला पाण्याअभावी या कुटुंबांची होणारी वनवन
आणि हाल उमजायला तयार नाही.
कुटुंबाचे हाल : सुमारे पांच महिन्यांपासून अर्जावर अर्ज करून येथील रहिवाशी पाण्यासाठी अधिकाऱ्यांचे उंबरे झिजवून हक्काच्या पाण्यासाठी मजबूर होऊन याचना करत आहेत. पाण्याअभावी मुलं-बाळ, विद्यार्थी, लहान-थोर, वृद्ध, चाकरमानी यांचे मोठ्याप्रमाणात हाल होत आहेत. या भागात रहिवाशांचे पिण्याचे पाणीच गायब झाले आहे.
वर्षभरापासून पाठपुरावा : येथील रहिवाशांनी महागरपालिकेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सुमारे वर्षभरापूर्वी येथील पाणीपुरवठ्याच्या समस्येबाबत स्थानिक रहिवाशांनी महापालिकेकडे तक्रारी केल्यानंतर नवीन जलवाहिनीचे काम हाती घेण्यात आले होते. नवीन जलवाहिन्या टाकल्या मात्र त्यातून पाणीच गायब झाले आहे, ढिम्म मानसिकतेच्या प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नवीन जलवाहिन्या अजून कोरड्या स्थितीत आहे. या जळवाहिणीतून पाणी कधी येईल आणि आपली तहान भागेल याची प्रतीक्षा करणेच रहिवाशांच्या हाती उरले आहे.
आम्हाला पाण्याची खूप गरज आहे, परंतु कॉर्पोरेशनचे पाणी आमच्या विभागाला येत नाही. यामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे आणि आमच्या दैनंदिन जीवनात खूप अडचणी येत आहेत. पिण्याचे पाणी भरण्यासाठी त्यांना भटकंती करावी लागत आहे.
लाखों रुपये ‘पाण्यात’ : पाणी मिळत नसल्याने आम्हाला टँकरचा आधार घ्यावा लागत आहे. त्यात सर्वसामान्य लोकांचे हजारो रुपये दररोज खर्च होत आहेत. याचा मोठा आर्थिक फटका या कुटुंबांना बसत आहे. लेकरा-बाळांच्या तोंडातील घास या टँकरवरील खर्चात हिरावला जात आहे.
नगरसेवकांनाही जुमानेना प्रशासन : याबाबत स्थानिक नगरसेवकांकडून देखील तक्रारी करून पाठपुरावा करण्यात आला. मात्र निगरगठ्ठ प्रशासन त्यांनाही जुमानायला तयार, अशीच काहीशी परिस्थिति निर्माण झाली आहे. मग आता या परिस्थितीत दाद कुणाकडे मागायची? या विवंचनेत येथील नागरिक आहेत.