अहिल्यानगर - श्री बाणेश्वर शिक्षण संस्थेचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय बुऱ्हाणनगर, अहिल्यानगर येथे शिवजयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी श्री बाणेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक युवा नेते अक्षयदादा कर्डिले यांच्या शुभहस्ते श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या फ्लेक्सचे अनावरण करण्यात आले. अक्षयदादा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले.
समाजात आजही महाराजांची शिकवण दिली जाते त्याचे अनुसरण आजची पिढी मोठ्या प्रमाणात करते, अशा प्रकारचे प्रबोधन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
यावेळी श्री बाणेश्वर शिक्षण संस्थेचे रजिस्ट्रार विलास बोर्डे, बुऱ्हाणनगर गावातील ग्रामस्थ, प्राचार्य डॉ. व्ही. एम. जाधव, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य हापसे सर, बी. एड. कॉलेजचे प्राचार्य शिर्के सर, तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष आमदार शिवाजीराव कर्डिले व बाणेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मनीषा पुंडे यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी डॉ. भाऊसाहेब मुळे, डॉ. राज मोहम्मद शेख, डॉ. स्वाती वाघ, डॉ. सुजाता सोनवणे, डॉ. वर्षा कीर्तने, प्रा. विठ्ठल कडूस सागर कोहक व महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी, सर्व स्वयंसेवक, यांनी कष्ट घेतले.