अहिल्यानगर - श्री बाणेश्वर शिक्षण संस्थेचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय बुऱ्हाणनगर, अहिल्यानगर येथे २७ फेब्रुवारी रोजी 'मराठी भाषा गौरव दिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉ. च. वि. जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.
त्यांना २३ वा संजीवनी खोजे राज्यस्तरीय काव्य पुरस्कार प्राप्त आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना कवी कुसुमाग्रज यांच्या ययाति, नटसम्राट, आणि गोविंदाग्रज यांचे 'एकच प्याला' या कादंबरी, नाटक यांना उजाळा दिला.
तसेच सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मराठी राजभाषेचे महत्व सांगितले. मराठी राजभाषेच्या गौरव दिनी पारंपरिक वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी तसेच प्राध्यापकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
याप्रसंगी श्री बाणेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब व संचालक युवा नेते अक्षयदादा कर्डिले यांनी मराठी गौरव भाषा दिनी शुभेच्छा दिल्या. अध्यक्ष म्हणून लाभलेले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्हि. एम. जाधव उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कीर्तने वर्षा यांनी केले आणि आभार प्रा. उजागरे सरांनी मानले.