अहिल्यानगर - श्री बाणेश्वर शिक्षण संस्थेचे कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय बुऱ्हाणनगर, अहिल्यानगर येथे २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पारनेर, रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. डी. आर. ठुबे यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्रात संशोधन करण्यास संधी उपलब्ध आहेत. वैज्ञानिक दृष्टिकोन समोर ठेवून संशोधन क्षेत्रातील चळवळीत सहभागी व्हावे असे प्रतिपादन केले.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व वैज्ञानिक क्षेत्रात प्रगती करण्यासाठी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त 'पोस्टर प्रेसेंटेशन' आणि 'रील मेकिंग' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
याप्रसंगी श्री बाणेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब व संचालक युवा नेते अक्षयदादा कर्डिले यांनी राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
अध्यक्ष म्हणून लाभलेले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्हि. एम. जाधव, आयक्यूएसी समन्वयक डॉ. आर. एच. शेख, विज्ञान शाखा विभाग प्रमुख डॉ. स्वाती जी. वाघ, प्रा. प्रियंका दिनकर, प्रा. पुनम राऊत, प्रा. हर्षदा ठाणगे, प्रा. पूजा कर्डिले, प्रा. देवयानी लोखंडे, प्रा. राजेश गाडेकर, उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ. मनीषा पुंडे यांनी केले आणि आभार प्रा. इप्तिसाम पठाण यांनी मानले. यावेळी विद्यार्थी व विद्यार्थिनी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.