अहिल्यानगर - घोडेगाव (ता. नेवासे) येथील गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने उत्कृष्ट निकालाची परंपरा सलग सातव्या वर्षीही कायम राखली आहे. यंदा देखील दहावीच्या परीक्षेत या विद्यालयाचे १०० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
सिद्धी कोकाटे ही विद्यार्थिनी ९६ टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम आली आहे. तर संस्कृती दहातोंडे ९५ टक्के गुण मिळवून द्वितीय, आणि वैष्णवी जरे ही ९४ टक्के गुण मिळवून तृतीय आली आहे. या शाळेतील १७ विद्यार्थ्यांना ८० ते ९० टक्के गुण मिळाले आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष विष्णू कराळे, प्राचार्या सुजाता जावळे, नेमाने, पटारे, तागड, बोरुडे, वाघ, घोलप, दहातोंडे, शर्मा, आदी विषय शिक्षकांचे तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये आतापासूनच इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. सध्या फक्त विज्ञान शाखेचे प्रवेश सुरु आहेत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष विष्णू कराळे सर यांनी दिली आहे.