बालसाहित्याच्या आकाशात शेवगावचा तारा उजळला, अभिषेक जोशी यांना राज्य पुरस्कार


शेवगाव (जि. अहिल्यानगर) - बालसाहित्य क्षेत्रात मोलाचे कार्य करणाऱ्या अमरेंद्र भास्कर बाल कुमार संस्थेचा विज्ञान विषयातील राज्य बालसाहित्य पुरस्कार शेवगाव येथील पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कुल मधील विज्ञान शिक्षक अभिषेक जोशी यांना 'खगोलशस्त्राची ओळख' या पुस्तकासाठी प्रदान करण्यात आला.

दि. 31 मे रोजी राष्ट्रभाषा प्रचार समिती, पुणे येथे सुप्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ व साहित्यिक श्री. न. म. जोशी, 'चिंटू'चे निर्माते व्यंगचित्रकार चारुहास पंडित व डॉ. मंदा खांडगे यांच्या हस्ते सन्मानपत्र व रोख रक्कम देऊन श्री जोशी यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी परीक्षक दिलीप गरुड, मृणाल जैन, डॉ. संगीता बर्वे, शिरीष चिटणीस यांची विशेष उपस्थिती होती. 'देशातील अवस्थ वर्तमान योग्य वळणावर आणण्याचे काम फक्त साहित्यिकच करू शकतात म्हणून बालसाहित्याने आता वास्तव मांडण्याचे धाडस करायला हवे', असे प्रतिपादन यावेळी न. म. जोशी यांनी केले.

श्री. अभिषेक जोशी यांचे प्रा. रमेश भारदे, हरीश भारदे, शिवदास सरोदे, संजय कुलकर्णी, सदाशिव काटेकर, उमेश घेवरीकर यांनी अभिनंदन केले आहे.

ही तर काळाची गरज - शिक्षकांनी वाचन, मनन व लेखन करणे ही काळाची गरज आहे. शिक्षकांनी वाचले तरच विद्यार्थी वाचतील. अभिषेक जोशी यांचा साहित्य सन्मान इतर शिक्षकांसाठी अनुकरणीय आहे. - हरीश भारदे (विश्वस्त. भा. सा. प्र. मंडळ)

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !