अहिल्यानगर - एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या वडगाव गुप्ता व इमामपूर घाटात अवैधरित्या तलवार घेऊन फिरणाऱ्या दोन जणांना एमआयडीसी पोलिसांनी पकडले आहे.
दि. ७ जून रोजी दुपारी तीन वाजेचे सुमारास सपोनि माणिक चौधरी यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
ओंकार सुनिल शिंदे (वय ३१, रा. माळवाडी, वडगाव गुप्ता) हा वडगाव गुप्ता शिवारातील मोकळ्या मैदानात अवैध्यरित्या लोखंडी धारधार तलवार घेवुन फिरत होता. ही तलवार जप्त करण्यात आली आहे.
तसेच दि. जून रोजी दुपारी पावणेचार वाजणेच्या सुमारास आदिनाथ देवराम तोडमल (वय ३१, रा. चापेवाडी, जेऊर बायजाबाई) हा इमामपुर घाटात लोखंडी धारधार तलवार घेवुन फिरत होता. त्यालाही पोलिसांनी पकडले.
या दोन्ही इसमाविरुदध एमआयडीसी पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील कारवाई करत आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शहर उपविभागीय अधिकारी अमोल भारती यांचे मार्गदर्शानाखाली करण्यात आली.
या कामगिरीत पोसई मनोज मोंढे, हेड कॉन्स्टेबल थोरवे, सुशांत दिवटे, राजु सुद्रिक, गणेश चौधरी, विष्णु भागवत, भगवान वंजारी, जयसिंग शिंदे, सुरज देशमुख, अक्षय रोहोकले, तांदळे यांचे पथक सहभागी झाले.