अहिल्यानगर – शहरात अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली असून दोन ठिकाणी धाड टाकून एकूण ९,१७,५५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी २९ आरोपींना ताब्यात घेतले आहेत.
त्यांच्यावर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम ४ व ५ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय जागा व साहित्य उपलब्ध करून देणाऱ्या दोन इसमांविरुद्धही कारवाई करण्यात आली आहे.
पहिली कारवाई अमरधामजवळील लोखंडी पुलाखालील पत्त्याच्या शेडमध्ये करण्यात आली. येथे १२ आरोपी तिरट नावाचा जुगार खेळताना आढळले. आरोपींची नावे पुढीलप्रमाणे.
मनोहर कोडम, सचिन परदेशी, तोहीब पठाण, (एकाचे नाव वयासहित अपूर्ण), सुनील साळवे, नाशीर खान, शुभम देवळालीवकर, आजीनाथ शिंदे, बाळासाहेब खटके, प्रकाश शहा.
दुसरी कारवाई दिनेश हॉटेलच्या मागील पत्र्याच्या शेडमध्ये करण्यात आली. येथे १७ आरोपी मिळून आले, त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
कोकणे, अमोल चव्हाण, संदीप सावंत, ओमकार पुंड, किरण लोंढे, संपिद घुंगुर्डे, अक्षय दातरंगे, सागर ठाणगे, प्रविण केकाळे, मनोज ओशीकर, गणेश टाक, किरण शिदोरे, संजय शेलार, सोनु दातरंगे, सुरज जाधव, विजय मुनोत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार पोलिस उपअधीक्षक (परिविक्षाधीन) संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोहेकॉ शंकर चौधरी, अरविंद भिंगारदिवे, अजय साठे, मल्लीकार्जुन बनकर, दिनेश मोरे, दिगंबर कारखिले, उमेश खेडकर, पोकों सुनिल दिघे, अमोल कांबळे, संभाजी बोराडे, जालिंदर दहिफळे यांनी केली.
पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे.