अहिल्यानगर - एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३२ लाख ६ हजार ३४३ रुपये किमतीच्या फटाक्यांची अवैध वाहतूक उघडकीस आली आहे. निंबळक बायपास रोडवरील लामखेडे पेट्रोल पंपाजवळ हा प्रकार समोर आला आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांना दि. २१ जून रोजी एका खबर्या याबद्दल माहिती दिली होती. त्याच्या आधारे पोलिसांकडून टाटा कंपनीचा कंटेनर व टाटा एस टेम्पोची तपासणी करण्यात आली.
पोलिसांना कंटेनरमध्ये विनापरवाना स्फोटक पदार्थ असल्याचे आढळून आले. यावेळी कंटेनर चालक सुरेशकुमार वेलस्वामी (वय ३५, रा. नामक्कल, तामिळनाडु) याच्याकडे कोणतेही परवाने नसल्याचे आढळले.
त्याच्यासह किरण संजय खामकर (रा. इसळक, ता. अहिल्यानगर) यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. दोघांविरोधात भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
यात पोलिस उपनिरीक्षक विनोद परदेशी, मनोज मोंढे, सहायक फौजदार खेडकर, पोलिस हेड कोन्स्टेबल पितळे, राजु सुद्रीक, किशोर जाधव, नवनाथ दहिफळे, मोबाईल सेलचे राहुल गुंडु, यांच्या पथकाने केली आहे.