सावधान ! संशयास्पद हालचालींवर पोलिसांची नजर; ६ जणांवर कारवाई, हॉटेल मॅनेजर गजाआड


अहिल्यानगर - जिल्ह्यात गुन्हेगारी व अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी गठीत केलेल्या विशेष पथकाने जामखेड शहरात मोठी कारवाई केली.

रात्रगस्त व कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान गुन्हा करण्याच्या उद्देशाने संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या ६ इसमांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

ठराविक वेळेनंतर सुरु असलेल्या हॉटेलवर छापा टाकून मॅनेजरविरुद्धही कायदेशीर कारवाई करण्यात आली. दिनांक १७ जून रोजी रात्री, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखालील विशेष पोलीस पथकाने ही कारवाई केली.

या पथकाने पुढील संशयितांना ताब्यात घेतले.
  • गणेश प्रभाकर चव्हाण (वय 29, रा. सावरगाव मारुती)
  • स्वप्निल नामदेव थोरात (वय 40, रा. सावरगाव मारुती)
  • शुभम सुर्यभान चव्हाण (वय 24, रा. सावरगाव मारुती)
  • देविदास रावसाहेब पवार (वय 35, रा. लेनवाडी)
  • सत्यजित भागवत शेंडगे (वय 21, रा. गेवराई, बीड)
  • आदित्य रामप्रसाद गजमल (वय 23, रा. निमगाव, गेवराई, बीड)

याचवेळी जामखेड-बीड रोडवरील 'स्वराज कला केंद्र' हे हॉटेल ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ सुरु असल्याचे निदर्शनास आल्याने, हॉटेल मॅनेजर विश्वास बाबुजी जाधव (वय 34, रा. जामखेड) याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम अंतर्गत कारवाई करण्यात आली.

ही महत्त्वपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे व वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

या विशेष पथकात पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोहेकॉ शंकर चौधरी, अजय साठे, मल्लीकार्जुन बनकर, दिगंबर कारखिले, उमेश खेडकर, पोलिस कॉन्स्टेबल सुनिल दिघे, अमोल कांबळे, संभाजी बोराडे, हे अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.

याप्रकरणी पुढील तपास व कायदेशीर प्रक्रिया जामखेड पोलीस स्टेशनमार्फत सुरू आहे. अहिल्यानगर जिल्हा पोलीस प्रशासनाने गुन्हेगारीवर कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !