नाशिक – 'युनिक ब्रेन बूस्टर प्री-प्रायमरी स्कूल' (पाथर्डी फाटा, नाशिक) आणि सकाळ माध्यम समूह यांच्या संयुक्त विद्यमाने, गार्नियर कंपनीच्या सहकार्याने आयोजित केलेल्या 'मोफत केस कलरिंग व ग्लोबल हायलाईट्स' उपक्रमाला पालकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
महिलांसह पुरुष पालकांनीही या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभाग घेतला. केसांचे ग्लोबल हायलाईट व कलरिंग पूर्णपणे मोफत करण्यात आले असून, पालकांनी आधीच स्वच्छ केस धुवून येत उपस्थित राहून उत्तम प्रतिसाद दिला.
शाळेच्या संचालिका आशा अनपट आणि ऍड. उमेश अनपट यांच्या पुढाकाराने आयोजित झालेला हा कार्यक्रम केवळ केस रंगवण्यापुरता मर्यादित न राहता पालकांमध्ये आनंद, संवाद आणि सहभागाची भावना वाढवणारा ठरला.
उपस्थित पालकांनी या अनोख्या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत शाळेचे व आयोजकांचे आभार मानले. भविष्यात अशा अधिक सामाजिक व सौंदर्यसदृढ उपक्रमांचे आयोजन व्हावे, अशी मागणी पालकांनी केली.