गोवा - फोंडा येथे १७ ते १९ मे २०२५ दरम्यान पार पडलेल्या ‘सनातन राष्ट्र शंखनाद’ महोत्सवात सनातन संस्थेच्या वतीने हिंदु धर्म व राष्ट्ररक्षणासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘हिंदु राष्ट्ररत्न’ आणि ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
‘हिंदु राष्ट्ररत्न’ पुरस्कार दिल्ली येथील ‘हिंदु फ्रंट फॉर जस्टिस’चे अध्यक्ष अधिवक्ता (पू.) हरि शंकर जैन यांना प्रदान करण्यात आला. श्रीराम मंदिर, काशी, मथुरा व भोजशाळेसह अनेक मंदिरांच्या मुक्तीसाठी त्यांनी लढा दिला आहे.
‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार दिल्लीचे मंत्री कपिल मिश्रा, ‘द केरला स्टोरी’चे निर्माते विपुल शहा, अधिवक्ता संजीव पुनाळेकर, गीता भवनचे गौरीशंकर मोहता आणि शिल्पकार प्रमोद कांबळे यांना देण्यात आला.
मंत्री कपिल मिश्रा यांनी हिंदु इकोसिस्टमच्या माध्यमातून संघटन घडवले असून दिल्ली दंगलीतही हिंदूंना मदत केली. विपुल शहा यांनी ‘लव्ह जिहाद’ व नक्षलवादावर आधारित चित्रपट निर्माण करून जनजागृती केली.
अधिवक्ता पुनाळेकर यांनी मालेगाव व मडगाव बॉम्बस्फोटातील आरोपींना न्याय मिळवून दिला. श्री. कांबळे यांनी शिल्पकलेतून राष्ट्रप्रेम जागवले. त्याबद्दल त्यांनाही या महोत्सवात पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
या महोत्सवात भारतासह २३ देशांतील ३० हजार लोकांनी सहभाग घेतला. संस्थापक डॉ. जयंत आठवले यांच्या ८३व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.