अहिल्यानगर – ऑक्झीलियम इंग्लिश मीडियम स्कूलच्या नवनियुक्त मुख्याध्यापिका सिस्टर मारिया यांचा नुकताच जाहीर सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्याचे आयोजन जाणिव फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले होते.
फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रदीप वाखुरे यांच्या हस्ते सिस्टर मारिया यांचा गौरव करण्यात आला. यावेळी शाळेच्या व्यवस्थापिका सिस्टर रिटा लोबो, ॲड. व नोटरी पब्लिक विक्रम वाडेकर (विश्वस्त, मोहटा देवस्थान), उपस्थित होते.
तसेच यावेळी राहुल जोशी, ॲड. व इंजिनीअर कैलाश दिघे, समाजसेवक संजय माने आणि विकास गायकवाड हेही मान्यवर उपस्थित होते. सत्कार प्रसंगी सिस्टर मारिया यांनी संस्थेप्रती आभार व्यक्त केले.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमाचे आयोजन सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडले.