शाब्बास ! जामखेड फायरिंग प्रकरणी २४ तासांत ६ आरोपी जेरबंद

येथे क्लिक करुन आमचे यु ट्युब चॅनल सबस्क्राईब करा

जामखेड (अहिल्यानगर) – जामखेड येथे रस्त्यावर लघवी करण्याच्या किरकोळ कारणावरून तरुणांवर गोळीबार करणाऱ्या ६ आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या २४ तासांत अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.


दि. 01 जून रोजी रात्री फिर्यादी आदित्य पोकळे व त्याच्या मित्रावर काही अनोळखी व्यक्तींनी वादातून हल्ला केला. यावेळी आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत फिर्यादी व साक्षीदाराच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी कुणाल पवार यांच्या पायाला लागली. या प्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेची गंभीरता ओळखून पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले. पोनि दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तयार करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे 02 जून रोजी प्रवरासंगम, नेवासा येथे सापळा रचून ६ आरोपींना अटक करण्यात आली.

अटक आरोपींमध्ये प्रभु रायभान भालेकर (निपाणी), नकुल मुळे, शरद शिंदे, गणेश आरगडे, रावबहादूर हारकळ व सुशील गांगवे यांचा समावेश आहे. त्यांच्या ताब्यातून फायरिंगमध्ये वापरलेले लायसन्सधारक पिस्टल, जिवंत राऊंड, रिकाम्या पुंगळ्या व दोन कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सध्या आरोपी जामखेड पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे. पोलीस अधीक्षक व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही यशस्वी कारवाई करण्यात आली.

Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !