शेवगावमध्ये सुगंधीत तंबाखू व मावा विक्रेत्यांवर कारवाई; ३.९८ लाखांचा मुद्देमाल जप्त


अहिल्यानगर – शेवगाव शहरात सुगंधीत तंबाखू व मावा तयार करून विक्री करणाऱ्या पाच इसमांविरुद्ध पोलीसांनी कठोर कारवाई करत ३ लाख ९८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात विशेष पथक तयार करून कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे हे १७ जून रोजी रात्री १०.३० च्या सुमारास शेवगाव शहरात पेट्रोलिंग करत होते.

त्यावेळी त्यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, काही इसम त्यांच्या घरी सुगंधीत तंबाखू मिसळलेली मावा तयार करून विक्री करत आहेत. पोलीस पथकाने पंचांसमक्ष नाईकवाडी मोहल्ला, भगतसिंग चौक आणि बंधन लॉन्स परिसरातील घरांवर छापा टाकला.

या कारवाईत ५ आरोपींना ताब्यात घेण्यात आले. आरोपींची नावे खलील नबिब शहा, अल्ताफ पठाण, कुणाल संजय पिसाळ, शहाबाज ताहेर खान पठाण आणि आफताब ताहेर खान पठाण अशी आहेत.

या छाप्यात मावा तयार करण्यासाठी वापरली जाणारी गिरणी, सुगंधीत तंबाखू, तयार मावा व अन्य साहित्य असा एकूण ३,९८,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर चौधरी विशेष पथकातील पोलीस मल्लिकार्जुन बनकर, दिगंबर कारखिले, उमेश खेडकर आदींच्या पथकाने केली आहे.

याप्रकरणी पोलीस नाईक प्रशांत चंद्रकांत आंधळे यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७४, २७५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास शेवगाव पोलीस करीत आहेत.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !