अहिल्यानगर - झापवाडी (ता. नेवासा) येथे महाराष्ट्राचे लोकप्रिय नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त एक सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबवण्यात आला.
माजी सरपंच पांडुरंग वाघ यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या उपक्रमात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात अनेक ग्रामस्थांनी रक्तदान करत आपली सामाजिक बांधिलकी जपली.
शिबिरात रुषीकेश शेटे, नाना ढेरे, राजू दराडे, रामकृष्ण आगळे, अरुण चांदघोडे, नामदेव येळवंडे, रुषीकेश पटारे, विशाल धनगर, सुरज शेटे, मनोहर पटारे, कैलास तरवडे, योगेश जरे, अर्जुन कोरडे, भरत झरे, राहुल तोडमल यांसह अनेक युवक व ग्रामस्थ उपस्थित होते.
या शिबिराच्या माध्यमातून समाजात रक्तदानाबाबत जनजागृती होण्यास मदत झाली आहे. या कार्यक्रमाचे आयोजन विधायक हेतूने केल्याने उपस्थित सर्वांनी आयोजकांचे कौतुक केले. 'एक थेंब रक्त, एखाद्या जीवाचे जीवन' हे ब्रीद जपत झापवाडीतील ग्रामस्थांनी एक प्रेरणादायी पाऊल उचलले.