अहिल्यानगर - शिर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भिमनगर परिसरात सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून सात जणांविरुद्ध कारवाई केली.
या कारवाईत पोलिसांनी २ लाख ९३ हजार रुपये किमतीचा रोख रक्कम, मोबाईल, मोटारसायकल व जुगार साहित्य असा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई ३० जुलै रोजी विशेष पोलिस पथकाने गुप्त बातमीच्या आधारे केली.
विशेष पोलीस पथक पेट्रोलिंग करत असताना भिमनगर परिसरात काही इसम आर्थिक फायद्यासाठी तिरट जुगार खेळत असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळाली.
या माहितीच्या आधारे तात्काळ शिर्डी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी पंचासमवेत छाप्यासाठी तयारी केली. छाप्यावेळी घराच्या वरच्या मजल्यावर काही इसम जुगार खेळताना दिसून आले. पोलीस पथकाने त्वरित कारवाई करत सात इसमांना ताब्यात घेतले.
पोलिसांनी केलेल्या तपासणीत त्यांच्या जवळून १३ हजार ४८० रुपये रोख, मोबाईल, मोटारसायकल व जुगार साहित्य असा एकूण २ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या ७ आरोपींविरुद्ध शिर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक केलेल्या आरोपींची नावे :
- दिलीप रामदास मेहेत्रे (वय ५८, रा. नांदुर्खी)
- रविंद्र दत्तात्रय लांडगे (वय ३६, रा. शिवशाही हॉटेल शिर्डी)
- विवेक अमृतलाल शर्मा (वय ४३, रा. माऊलीनगर शिर्डी)
- फकिरचंद जोगीलाल लोढा (वय ५४, रा. पिंपळवाडी रोड शिर्डी)
- रुपेश सुरेश पोपटे (वय ३४, रा. कालीकानगर शिर्डी)
- मुरगन शंकर यादव (वय ३४, रा. दत्तनगर शिर्डी)
- हरुन कंकर शेख (वय ६०, रा. पुनमनगर शिर्डी).
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे व उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
विशेष पोलीस पथकात पोलिस हेड कॉन्स्टेबल सुनिल पवार, दिगंबर कारखेले, अरविंद भिंगारदिवे, मल्लिकार्जुन बनकर, उमेश खेडकर, दिनेश मोरे, योगेश भिंगारदिवे, पोलिस नाईक अमोल कांबळे, दिपक जाधव, विजय ढाकणे व जालिंदर दहिफळे यांचा सहभाग होता.
शिर्डी परिसरात सुरु असलेल्या अवैध जुगार व्यवसायांवर पोलिसांनी घेतलेल्या या धडक कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.