अहिल्यानगर - जिल्ह्यातील पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीतील माणिकदौंडी गावाच्या शिवारात एका शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या तिरट नावाच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे.
या कारवाईत एकूण ११ लाख ६१ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच १० जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात मोहीम हाती घेण्यात आली असून त्याअंतर्गत विशेष पोलीस पथकाने २४ जुलै रोजी ही कारवाई करण्यात आली.
गुप्त माहितीच्या आधारे पथकाने पाथर्डी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांसह माणिकदौंडी शिवारातील पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकला. त्या ठिकाणी असीर उर्फ छोटू पठाण नामक इसम जुगार खेळवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने छापा टाकला.
छाप्यादरम्यान काही इसम जुगार खेळताना आढळले. पोलिसांची चाहूल लागताच काही आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले.
या कारवाईत ४६ हजार ५००रुपये रोख रक्कम, ७ मोबाईल फोन (किंमत ६५ हजार रुपये), तसेच ६ लहान-मोठ्या वाहनांतील एकूण १० लाख ५० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांनी पंचासमक्ष कारवाई करत सर्व १० इसमांना ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात पाथर्डी पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ताब्यात घेतलेले आरोपी पुढीलप्रमाणे –
- असीर उर्फ छोटू पठाण (वय ४०, रा. माणिकदौंडी)
- कलीम नूर मोहम्मद शेख (वय ५१, रा. कोरडगाव)
- गणेश विष्णू पवळे (वय ४२, रा. पाथर्डी)
- सोमनाथ रावसाहेब चितळे (वय ३८, रा. चितळवाडी)
- फिरोज इम्रान पठाण (वय ४२, रा. पाथर्डी)
- जुबेर अफसर अली सय्यद (वय ३०, रा. माणिकदौंडी)
- अशोक भगवान दहिफळे (वय ४३, रा. मोहटा)
- शाकीर उस्मान पठाण (वय ४८, रा. मानोर, ता. शिरूर, जि. बीड)
- सलमान कलीम शेख (वय २६, रा. कोरडगाव)
- अंबादास बन्सी चितळे (वय ४०, रा. चितळवाडी).
या कारवाईमुळे परिसरातील अवैध जुगार अड्ड्यांना चाप बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पाथर्डी पोलीस करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या विशेष पथकातील पोलिस उपनिरीक्षक योगेश चाहेर व राजेंद्र वाघ यांच्यासह हेड कॉन्स्टेबल शंकर चौधरी, दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, अजय साठे, सुनिल पवार, उमेश खेडकर, अरविंद भिंगारदिवे, दिनेश मोरे, कॉन्स्टेबल सुनिल दिघे, अमोल कांबळे, संभाजी बोराडे, विजय ढाकणे, दिपक जाधव, जालिंदर दहिफळे यांनी केली.