कृषी दिन ! 'युनिक ब्रेन बूस्टर स्कुल' च्या शिलेदारांना शेत शिवाराची भुरळ

नाशिक : युनिक ब्रेन बूस्टर प्री-प्रायमरी स्कूलमध्ये महाराष्ट्र कृषी दिनानिमित्त एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा दिवस हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृतिदिनानिमित्त साजरा केला जातो. या कार्यक्रमात शाळेतील चिमुकल्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. या दिवशी शाळेने घडवून आणलेल्या शेत शिवारातील सफरीने मुलांना अक्षरशः भुरळ घातली. 



बिजरोपण, वृक्षारोपण...
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी बीज रोपणाचा उपक्रम हाती घेतला. प्रत्येक मुलाने एक झाड लावून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. तसेच, शेतकऱ्यांचा सन्मान करण्यासाठी 'शेतकरी गीत' सादर करण्यात आले. पालकांनीही मुलांना पारंपरिक शेतकरी वेषभुषेत तयार करून पाठवत मुलांना प्रोत्साहन दिले.


"लहान वयातच मुलांना शेती आणि शेतकऱ्यांच्या योगदानाबद्दल माहिती देणे महत्त्वाचे आहे. या उपक्रमातून मुलांमध्ये पर्यावरण आणि शेतीबद्दल जागरूकता निर्माण होईल."
-सौ. आशा अनपट, डायरेक्टर

मुले थेट शेतशिवारात
शेतकऱ्यांच्या समर्पित आयुष्याची प्रत्यक्ष अनुभूती देण्यासाठी मुलांना थेट शेतीची सफर घडवून आणली. येथे शेती, पीक, गुरे-ढोरे, ट्रॅक्टर, शेती साहित्य दाखवून त्यांची माहिती मुलांना देण्यात आली. समारोप एका छोट्या प्रदर्शनाने झाला, ज्यात विद्यार्थ्यांना बनवलेल्या शेतीविषयक चित्रांचे प्रदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाने सर्वांना शेतीच्या महत्त्वाची जाणीव करून दिली.

कृषीदिन कार्यक्रम आणि कृषी सफर या दोन्हीच्या नियोजनासाठी हर्षाली हिरे, सीमा देवतळे, प्रियंका चोक,  रोशनी पवार या स्कूलच्या ट्रेनर्स, स्टाफ व दमयंती चौधरी आणि रुपाली गवळी या मदतनीस यांनी परिश्रम घेतले.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !