अहिल्यानगर – कोल्हार, ता. राहाता येथे गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या एका संशयितास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे आणि मोबाईल असा एकूण ६१,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला अक्षय राजेंद्र पायमोडे (वय २६, रा. प्रवरानगर, लोणी) व त्याचा साथीदार कोल्हार भगवतीपूर येथील बेलापूर रोडवरील कुंकलोळ कॉम्प्लेक्स परिसरात गावठी कट्ट्याची विक्रीसाठी थांबले असल्याची माहिती मिळाली होती.
त्यानुसार पथकाने तात्काळ घटनास्थळी छापा टाकत अक्षय पायमोडे यास ताब्यात घेतले. मात्र त्याचा साथीदार अनिकेत देवेंद्र भोसले (रा. प्रवरानगर, लोणी) हा पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे.
ताब्यात घेतलेल्या आरोपीकडून पोलिसांनी गावठी पिस्टल (किंमत ४९ हजार रुपये), दोन जिवंत काडतुसे (किंमत २ हजार रुपये) आणि मोबाईल (किंमत १० हजार रुपये) असा एकूण ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे
याप्रकरणी लोणी पोलीस स्टेशन येथे भारतीय हत्यार कायदा कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास लोणी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरिक्षक तुषार धाकराव व त्यांच्या पथकाने केली आहे.