नेवाशात अवैध वाळु तस्करी रॅकेटवर पोलिसांच्या विशेष पथकाचा छापा, २७.१६ लाखांचा मुद्देमाल जप्त


अहिल्यानगर - नेवासा पोलीस स्टेशन हद्दीत १६ जुलै २०२५ रोजी अवैध वाळू वाहतूक प्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या विशेष पथकाने एकूण २७ लाख १६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करत ६ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांना कापूर डहू, नेवासा खुर्द येथे अवैध वाळू वाहतुकीची माहिती मिळाली. त्यांनी तेथे नेवासा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांसह छापा टाकला. कारवाई दरम्यान तीन वाहने, दोन ढंम्पर व एक टेम्पो पकडला.

त्यामध्ये भरलेली वाळूसह एकूण किंमत २७ लाख १६ हजार रुपये इतकी आहे. पकडण्यात आलेले चालक व त्यांची नावे : सोमनाथ लक्ष्मण पवार (वय ३४, रा. खडका फाटा, नेवासा), सागर शिवाजी माळी (वय २०, रा. गंगानगर, नेवासा)

फरार झालेल्या वाहन मालकांची नावे : राहूल बाळासाहेब शिंदे (रा. माकोटा, नेवासा), नामू कुसळकर (रा. गंगानगर, नेवासा), छोटू लष्करे (रा. नेवासा खुर्द) याप्रकरणी नेवासा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबरमे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुनिल पाटील यांच्या नेतृत्वात परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या विशेष पथकाने केली.

या कारवाईमुळे नेवासा परिसरातील अवैध वाळू वाहतुकीला मोठा आळा बसणार असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांतून व्यक्त होत आहे.

कारवाई करणाऱ्या पथकात पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, पोहेकॉ शंकर चौधरी, अजय साठे, दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर, सुनिल पवार, उमेश खेडकर, अरविंद भिंगारदिवे, दिनेश मोरे, सुनिल दिघे, अमोल कांबळे, संभाजी बोराडे, विजय ढाकणे, दिपक जाधव, जालिंदर दहिफळे यांचा समावेश आहे.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !