येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
शेवगाव (अहिल्यानगर) - स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे खरे हिंदुत्व आणि तळागाळातील सामान्य कार्यकर्त्याला सन्मान देण्याचे कार्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना करत आहे. बोधेगाव आणि परिसरातील प्रलंबित प्रश्नही लवकरच मार्गी लागतील, असे मत अहिल्यानगर जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांनी व्यक्त केले.
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे नुकतेच शिवसेना शाखेच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हा प्रमुख अनिल शिंदे बोलत होते. कार्यक्रमाला शहर प्रमुख सचिन जाधव, तालुका प्रमुख आशुतोष डहाळे, शहर प्रमुख अमर पुरनाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
सचिन जाधव यांनी संघर्ष आणि सेवा हेच शिवसेनेचे खरे ब्रीद असून सत्तेत असताना जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी झटू, असे सांगितले. या कार्यक्रमात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली.
- जिल्हा परिषद गटप्रमुख : शिवकुमार शिंदे (बोधेगाव), सुधीर जावळे (लाडजळगाव)
- पंचायत समिती गणप्रमुख : योगेश शिंदे (बोधेगाव), महेश चौधरी (मुंगी)
- शिवसेना शाखाप्रमुख : विजय घोरतळे (बोधेगाव)
- शाखा उपप्रमुख : कृष्णमूर्ती गिरी
- युवासेना शाखाप्रमुख : सचिन साळुंके, उपप्रमुख – ज्ञानेश्वर तांबे
- शाखा सचिव : किरण काशिद
यावेळी संग्राम काशिद, अजय घोरतळे, समीर सय्यद, काशिनाथ कलाल, शंकर गमे, एकनाथ सुसे, गणेश डोंगरे, ओम तांबे, सुमित चव्हाण, सुमित जैन, प्रतीक पलाटे, ओंकार दिवटे, सुरज भोसले, सोहेल शेख, अक्षय कांबळे, कृष्णा खेडकर, इरफान पठाण, आसिफ कुरेशी, अर्शद कुरेशी, सोनू कुरेशी, संतोष गुरव, रोहीत परदेशी, वैभव तोडकरी तसेच युवासेनेचे जिल्हा उपप्रमुख महेश घोरतळे आदींची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद मिसाळ यांनी केले, तर मूनव्वर शेख यांनी आभार प्रदर्शन केले. या शाखेच्या स्थापनेनंतर बोधेगाव परिसरात शिवसेनेच्या संघटनात्मक बळकटीकरणास गती मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.