सुगंधी तंबाखू व मावा कारखान्यावर पोलिसांचा छापा, २.०८ लाखांचा मुद्देमाल जप्त, चार अटकेत


अहिल्यानगर - शहरातील काटवण खंडोबा रोड परिसरात सुगंधीत तंबाखू व मावा तयार करणाऱ्या अवैध कारखान्यावर परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या पोलिस पथकाने छापा टाकत मोठी कारवाई केली. 



तब्बल २ लाख ८ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार आणि परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने केली.

गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी डांगे मळा, काटवण खंडोबा रोड येथील विश्वास डांगे यांच्या पत्र्याच्या शेडवर छापा टाकला असता, काहीजण सुगंधीत तंबाखू, सुपारी आणि चुना यांच्या मिश्रणाने मावा तयार करताना आढळले. यावेळी पोलिसांनी चार जणांना अटक केली.

अटक करण्यात आलेले आरोपी:
शाम पांडुरंग मोकाटे (वय २८)
कैलास बबनराव मोकाटे (वय ५८)
सुभाष गुलाबराव डागवाले (वय ५३)
राहुल सुधीर पारधे (वय ३४)

आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्यवसाय कैलास मोकाटे आणि सुभाष डागवाले चालवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. जप्त मुद्देमालामध्ये:

  • सुगंधीत तंबाखू – ३६ किलो (₹२४,०००)
  • तयार मावा – १९ किलो (₹१९,०००)
  • मावा तयार करण्याच्या २ मोठ्या मशीन – ₹१,६०,०००
  • एक लहान मशीन – ₹५,५००
  • एकूण जप्त मुद्देमालाची किंमत ₹२,०८,५००/- एवढी आहे.

याप्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये अन्न सुरक्षा कायद्यानुसार कलम ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबमे व नगर शहरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या देखरेखीखाली करण्यात आली.

या विशेष पथकात पोसई राजेंद्र वाघ, पोहेका शंकर चौधरी, अजय साठे, दिगंबर कारखेले, मल्लिकार्जुन बनकर आदींचा समावेश होता. अवैध तंबाखू उत्पादन व विक्रीस बंदी असतानाही असे धंदे बिनधास्त सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. नागरिकांमधून या कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !