शिष्यवृत्ती परीक्षेसाठी शिक्षक कार्यशाळा, शिक्षण प्रक्रियेत नियोजन, सातत्य महत्त्वाचे : भास्कर पाटील


शेवगाव (अहिल्यानगर) – जिल्हा परिषद अहिल्यानगर व पंचायत समिती शेवगाव, यांच्या संयुक्त विद्यमाने त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल येथे इयत्ता 5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी तालुकास्तरावर मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

या कार्यशाळेला शेवगाव तालुक्यातील सर्व शाळांतील शिष्यवृत्ती विषयक शिक्षकांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी भास्कर पाटील व शिक्षण विस्तार अधिकारी जयश्री कार्ले यांनी मार्गदर्शनपर भेट दिली.

आपल्या भाषणात पाटील म्हणाले, 'शैक्षणिक यशासाठी नियोजन, सातत्य आणि पालक-शाळा समन्वय अत्यावश्यक आहे. 'मिशन आरंभ' या उपक्रमातून गुणवत्तावाढीसाठी होत असलेल्या सराव परीक्षांचे विश्लेषण करणे आणि त्यानुसार पूरक मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.

त्यांनी 9.30 ते 10.30 या वेळेत जादा तासिकांचा उपयोग करून विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले. विस्तार अधिकारी जयश्री कार्ले यांनी मागील वर्षाच्या शिष्यवृत्ती निकालांचे शाळानिहाय विश्लेषण मांडले आणि शिक्षकांना उपयुक्त सूचना दिल्या.

कार्यशाळेत गटशिक्षणाधिकारी शैलजा राऊळ, डॉ. शंकर गाडेकर, उद्धव बडे, केंद्रप्रमुख रघुनाथ लबडे, विष्णू गायकवाड, समन्वयक बाळासाहेब कोकरे, प्राचार्य शिवाजीराव काटे, व गटसाधन केंद्रातील विषयतज्ञ मान्यवर उपस्थित होते.

शिष्यवृत्ती मार्गदर्शनासाठी सुनील पायमोडे, कुशाबा पलाटे, गोरक्षनाथ दुसुंगे व निलेश दौंड यांनी सविस्तर सत्र घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रघुनाथ लबडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन देवीदास खडके यांनी केले. या कार्यशाळेमुळे शिक्षकांना नव्या दिशा मिळाल्याची प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !