कोरेगाव (सातारा) - कृतिशील उपक्रम राबविण्यात महाराष्ट्र अंनिसची कोरेगाव शाखा अग्रेसर आहे. भावी काळातही यामध्ये सातत्य निश्चितच राखलं जाईल असे ठाम प्रतिपादन महिलेला जटामुक्त केल्यानंतर महाराष्ट्र अंनिसचे सातारा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत बर्गे यांनी केले.
कोरेगाव येथील येथील हुतात्मा स्मारकात भाकरवाडी तालुका कोरेगाव येथील संगीता चव्हाण या महिलेचे जटा मुक्ती अंनिसचे राज्य कार्यकारिणी सदस्य प्रशांत पोतदार व राज्य कायदा विभाग सदस्य ॲड. हौसेराव धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा येथील लाजली ब्युटी पार्लरच्या संचालिका ब्युटीशियन हर्षाली पोतदार यांनी केले.
यावेळी अंनिसचे जिल्हा प्रसार माध्यम सचिव दशरथ रणदिवे, सातारा शहर प्रसार माध्यम सचिव तथा युवा कार्यकर्ते राजेश पुराणिक, कोरेगाव शाखेचे कार्यकर्ते हेमंत जाधव, सुधाकर बर्गे, जगुबाई फरांदे, मानस पोतदार आदी कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते.
यावेळी प्रशांत पोतदार यांनी आपले मनोगतामध्ये 'शहिद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतीस अभिवादन करून आजची जंटामुक्ती हे त्यांच्याप्रती अनोखे अभिवादन आहे', असे निर्धार पूर्वक सांगितले.
ॲड. हौसेराव धुमाळ दाभोलकर यांचे विचार कृतिशीलपणे पुढे नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असा निर्धार कार्यकर्त्यांसह व्यक्त केला. हर्षाली पोतदार व कार्यकर्त्यांनी अलगदपणे जटामुक्त केले. त्यामुळे गेल्या १० वर्षाचे ओझे कमी झाले. आता पुर्णत: हलकं हलकं वाटतंय.
जटामुक्त होतानाही काहीनी विधीवत पुजा घालण्यासाठी सुचविले व तसे न केल्यास धोका निर्माण होईल, अशी मानसिक भीती घालण्याचा प्रयत्न केला. पण माझी समस्या आणि अंनिस कार्यकर्त्यांचे समुपदेशन यामुळे यामधून मुक्ती मिळवण्याच्या इच्छेनेच त्यावर मात केली, असे भावपूर्ण मनोगत पीडित संगीता चव्हाण यांनी व्यक्त केले.
अंतिमतः प्रशांत पोतदार यांनी अशा प्रकारचे जटामुक्तीचे काम अंनिसचे कार्यकर्ते मोफत करतात. त्यामुळे असा त्रास असलेल्यांनी निर्भयपणे संपर्क साधून जटामुक्त व्हावे. असे आवाहन केले. सर्व उपस्थित सहकारी कार्यकर्ते यांचे आभार मानले विवेकाचा आवाज बुलंद करूया या घोषणेने उपक्रम संपन्न झाला.