पुणे – बाणेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थ विरोधात राबविण्यात आलेल्या मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई करत पोलिसांनी दोन इसमांच्या ताब्यातून ३ किलो ४०० ग्रॅम गांजा (किंमत ६८ हजार रुपये) जप्त केला आहे. ही कारवाई बाणेर येथील ब्लुमिंग डेल्स सोसायटीजवळ, ज्युपिटर हॉस्पिटलसमोर करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले आरोपी पुढीलप्रमाणे आहेत :
१) रवि विजय वर्मा (वय १९ वर्षे)
२) कौशेलेंद्र नथुप्रसाद वर्मा (वय २३ वर्षे)
दोघेही सध्या पिंपळे सौदागर येथील शिव कॉलनीत वास्तव्यास असून मूळचे उत्तर प्रदेशमधील चित्रकुट जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
या दोघांकडे गांजासारखा अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने बाळगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर बाणेर पोलीस ठाण्याच्या पथकाने तत्काळ कारवाई केली. पोलिसांनी या दोघांना अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, उप आयुक्त सोमय मुंढे, आणि सहायक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
संपूर्ण ऑपरेशनचे नेतृत्व बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. त्यांना पो.नि. (गुन्हे) अलका सरग, सपोनि डाबेराव, सपोनि नंदकुमार कदम, सपोनि अनिल माने, पोलीस कर्मचारी पोउपनि संदेश माने, शैला पाथरे, सपोफौ सपकाळ, गायकवाड, आहेर, शिंगे, इंगळे, गाडेकर, खरात, राऊत, भोरे, काळे, खुडे, पाथरुट, आणि बर्गे यांनी सहकार्य केले.
बाणेर पोलीस ठाण्याच्या या धडाकेबाज कामगिरीमुळे या परिसरात अंमली पदार्थ विक्रीवर आता मोठा आळा बसला आहे. पुणे शहर पोलिसांकडून अशीच कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी दिला आहे.