ऑनलाईन बिंगो जुगार अड्ड्यावर एलसीबीचा छापा, १६ आरोपी ताब्यात, ४.९८ लाखांचे साहित्य जप्त


अकोले (अहिल्यानगर) – अकोले शहरात ऑनलाईन बिंगो, मटका व ‘डॉलर’ नावाचा जुगार खेळविणाऱ्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकत १६ आरोपींना पकडले. या कारवाईत ४ लाख ९८ हजार ७०० रुपयांचे जुगाराचे साहित्य व साधने जप्त करण्यात आली.

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि अनंत सालगुडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलीस अंमलदार गणेश लोंढे, भाऊसाहेब काळे, सागर ससाणे, आकाश काळे व अरुण मोरे हे या पथकात सहभागी होते.

दि. १८ ऑगस्ट रोजी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अकोले बसस्थानकासमोर नवले कॉम्प्लेक्समधील एका गाळ्यात काहीजण ऑनलाईन जुगार खेळत असल्याचे समजले.

पोलिसांनी तातडीने छापा घालून यांना रंगेहात पकडले.
  • नितीन निवृत्ती गायकवाड
  • अमोल मारुती मोहिते
  • वैभव राजेंद्र गायकवाड
  • व्हेल्सी गफुर वाघीलो
  • अक्षय बाबासाहेब सकट
  • गोपी भाऊराव आवारी
  • अरबाज मोहम्मद शेख
  • आकाश संजय परदेशी
  • रमेश एकनाथ फापाळे
  • अनिल बाळु पवार
  • विकास दत्तात्रय आबरे
  • खंडु केरु सदणीर
  • शंशीकांत मुरलीधर बेनके
  • अशोक राजेंद्र जगताप
तर गणेश हौसराव साबळे व अतुल जालिंदर नवले हे आरोपी फरार झाले आहेत. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेतील आकाश राजेंद्र काळे यांच्या फिर्यादीवरून अकोले पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गुन्ह्याचा पुढील तपास अकोले पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !