देशभक्तीच्या जल्लोषात सेंट जॉन स्कूलचा स्वातंत्र्यदिन उत्सव


राहाता (अहिल्यानगर) : सेंट जॉन स्कूल, राहाता येथे १५ ऑगस्ट रोजी ७९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीच्या जल्लोषात साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात आकर्षक मार्च पास्ट सादर करून वातावरण भारून टाकले.

विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, नृत्य, भाषणे तसेच, समूहगायन अशा विविध सादरीकरणांनी प्रेक्षकांची मने जिंकली. के.जी. ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लक्षणीय ठरला.

इंग्रजी, हिंदी व मराठी या तीन भाषांतील प्रभावी भाषणांनी कार्यक्रमाला विशेष रंगत आणली. शाळेचे मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्यदिनाचे महत्त्व समजावून सांगत राष्ट्रप्रेम, शिस्त व ऐक्य या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित केले.

प्रमुख पाहुण्या नंदा वाघे, सोमनाथ वाघे, अनिल बनकर व विशेषतः सविता बनकर यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी रेव्ह. फादर पॉली डिसिल्वा होते तर सिस्टर कैताना व सिस्टर टेरेसा यांचीही उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली गाडेकर व प्रांजल जगताप यांनी उत्तम प्रकारे केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा सहभाग महत्त्वाचा ठरला.

या प्रसंगी शिर्डी साई असोसिएशन यांच्या वतीने शाळेला जेवणाचे आयोजन करून उपक्रमाला विशेष सहकार्य करण्यात आले.

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !