आदिवासी मुलींनी थर लावून फोडली दहीहंडी
विजयी संघाला इलेक्ट्रिक बाईक पारितोषिक
महिलांसाठी लकी ड्रॉ : ३१ पैठण्या
२१ सोन्याच्या नथी.
नाशिक : पाथर्डी फाटा येथील गामणे मैदानावर राजमुद्रा वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने आयोजित भव्य दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळकृष्ण शिरसाठ यांनी केले. कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने साजरा होणारा हा उत्सव स्थानिक नागरिकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला. हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी उत्सवाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला.
सीमाताई हिरे यांनी भाषणात म्हटले की, "अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे समाज एकजूट राहतो." उत्सवात सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत आणि नृत्याच्या जल्लोषाने वातावरण भारलेले होते.
"स्टारकास्ट' आणि नेत्यांनी वेधले लक्ष्य उत्सवाला अधिक रंगत आणण्यासाठी सेलिब्रिटींची उपस्थिती लाभली. अभिनेत्री अनिता दाते, अभिनेता प्रशांत महाजन, रीलस्टार नम्रता पाटील आणि रॅपर किंग स्टोनर माने यांनी स्टेजवर हजेरी लावली. त्यांच्या परफॉर्मन्सने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. राजकीय नेत्यांची उपस्थितीही उत्सवाला चार चाँद लावणारी ठरली. नाशिक पश्चिमच्या आमदार सौ. सीमाताई हिरे, भाजप जिल्हाध्यक्ष सुनीलभाऊ केदार, महेशभाऊ हिरे यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि पाथर्डीतील मान्यवरांनी हजेरी लावली.
अनिता दाते यांनी दहीहंडीच्या परंपरेबद्दल बोलताना सांगितले की, "हा उत्सव एकता आणि साहसाचे प्रतीक आहे." प्रशांत महाजन यांनीही उत्सवाच्या आयोजकांचे कौतुक केले.
राजमुद्रा वेल्फेअर फाउंडेशनने या उत्सवाद्वारे सामाजिक एकता आणि महिला सशक्तीकरणावर भर दिला. अशा कार्यक्रमांमुळे ग्रामीण भागातील तरुणांना प्रेरणा मिळते. उत्सव यशस्वी होण्यासाठी आयोजकांनी केलेल्या कष्टांचे सर्वत्र कौतुक होत आहे.


.jpeg)
