शेवगाव (अहिल्यानगर) - येथील पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कुल मधील इतिहास विभागाच्या वतीने संग्राहक महेश लाडने यांच्या ऐतिहासिक दुर्मिळ नाणी व नोटा प्रदर्शनाचे आयोजन मंगळवारी सकाळी १० ते दु. 3 वेळेत करण्यात आले.
या प्रदर्शनाचे उद्घाटन हरीश भारदे व प्रा. संजय कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलतांना महेश लाडने म्हणाले की, 'मोबाईल हातातून निघाला तरच छंदाना वेळ मिळू शकतो.
छंद तुमच्या व्यक्तिमत्व विकसनासोबत मनाला आनंद देत फावला वेळ चांगल्या गोष्टीत घालवण्यास बळ देतात. म्हणून विद्यार्थ्यांनी आवर्जून छंदासाठी वेळ द्यावा'. या प्रदर्शनात २५ विविध देशातील नाणी व नोटा, त्यांची रंजक कहाणी देत महेश लाडने यांनी विद्यार्थ्यांचे उद्बोधन केले.
इयत्ता पाचवी ते दहावीच्या ९५० विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन सुयोग बकोरे, दिलीप पालमकर, रवींद्र पवार, प्रसाद जहागीरदार व सर्व इतिहास शिक्षकांनी केले.