काटे पुढे सरकत आहेत
मुठीतली मऊ वाळू ओसरत चाललीय
किती विचार करायचा..?
आणि का..?
संवेदना आहेत म्हणून..?
सभोवताली कोडग्यांची वस्ती असलेल्या जगात
आपण तरी का विषण्ण व्हावं ?
चालतं तसं चालू द्यावं
विचारांना शिवू द्यायचं नाही
त्रासाला जवळ घ्यायचं नाही
दगड फुटला...
पाण्यात पडला...
खाली रुतून बसला
तो खाली.. आपण वर
येईल घेऊन कुणीतरी
विचार करणं सोडून द्यावं..
दुनियादारी प्रश्नच घेऊन येणार..
दारात तुझ्या...
वापर होत राहील...
पळत सुटणार आहेस तू
त्याचं सुख... त्यांचा आनंद
अन् तू फुले उधळशील..
ही फुलंही संपतील...
तरीही तुझ्याकडे मागणी होतच राहिल..
लाटा येतच राहतील
भिजशील आतून
अभिषेक होतांना
काळ मात्र सरकतोच आहे..
- जयंत येलुलकर (अहिल्यानगर)