येथे क्लिक करुन आम्हाला फॉलो करा
अहिल्यानगर – रोटरी क्लब ऑफ अहमदनगर प्रियदर्शिनीच्या अध्यक्षा रोटेरियन मिनल ईश्वर बोरा यांना रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१३२तर्फे ‘स्टार वुमन ऑफ द इयर इन रोटरी’ या सर्वोच्च पुरस्काराने गौरविण्यात आले. जालना येथे पार पडलेल्या ’विजयोत्सव’ पुरस्कार समारंभात हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात आला.
या भव्य सोहळ्याला रोटरी विश्वातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. प्रमुख पाहुणे म्हणून पीडीजी रो. मोहन पालेशा, पीडीजी रो. शिरीष रायते, रो. दादा साळुंखे, रो. विष्णू मोंढे, रो. हरीश मोटवानी, रो. रुक्मेश जाखोटिया उपस्थित होते.
यावेळी विद्यमान जिल्हा प्रांतपाल रो. सुधीर लातूरे, डीजीई रो. जयेश पटेल व डीजीएन रो. क्षितिज झावरे उपस्थित होते. पीडीजी रो. डॉ. सुरेश साबू आणि डिस्ट्रिक्ट फर्स्ट लेडी रो. निर्मला साबू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
रोटरी जिल्हा ३१३२ मधील ११ महसूल जिल्ह्यांमधून सर्वोत्कृष्ट महिला अध्यक्ष म्हणून रोटेरियन मिनल बोरा यांची निवड झाली. त्यांच्या अध्यक्षीय कार्यकाळात त्यांनी रोटरीच्या सर्व फोकस एरियात उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांच्या प्रभावी, प्रेरणादायी आणि सर्वसमावेशक नेतृत्वाच्या जोरावर त्यांनी हा मानाचा पुरस्कार मिळवला.
त्यांच्या नेतृत्वाखाली क्लबने अनेक नामांकित पुरस्कार पटकावले आहेत. यामध्ये –
- सर्वोत्तम बाल आरोग्य सेवा पुरस्कार
- सर्वोत्तम महिला सभासद वाढ पुरस्कार
- सर्वोत्तम सार्वजनिक प्रतिमा निर्माण पुरस्कार
- डीजी सायटेशन
- स्टार वुमन ऑफ द इयर इन रोटरी
- सर्वोत्तम बुलेटिन पुरस्कार
- सेव गर्ल चाईल्ड ट्रॉफी
- सर्वोत्तम टीआरएफ वृद्धिंगत करणारा क्लब
- सर्वोत्तम आरोग्य संवर्धन ट्रॉफी
- सर्वोत्तम इंटरनॅशनल सर्व्हिस अवार्ड
श्रीयुत श्रीगोपाल धूत फाऊंडेशनच्या सीएसआर निधीद्वारे राबवलेल्या हॅपी स्कूल प्रकल्पांतर्गत विविध कामे, तसेच रो. छाया फिरोदिया यांच्या सहकार्याने सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन इ. उपक्रमांबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले.
टीआरएफमध्ये योगदान देणाऱ्या रो. आशा फिरोदिया, रो. अनुराधा आठरे, रो. सविता काळे, रो. लता भगत यांचाही त्यांनी विशेष गौरव केला. क्लबच्या सहाय्यक प्रांतपाल रो. किरण कालरा यांनी वर्षभर क्लब आणि जिल्ह्याच्या दुव्याची भूमिका निभावल्याचे त्यांनी नमूद केले.
या यशात माझ्या पती आणि क्लबचे फर्स्ट मॅन रो. ईश्वर बोरा यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून मला बळ दिले, असे सांगत त्यांनी आपल्या कुटुंबाचेही आभार मानले. जिल्हाभरातील रोटरी चळवळीतील महिलांसाठी हे यश प्रेरणादायी ठरले असून, या समारंभाला सुमारे ६०० हून अधिक रोटेरियन्स उपस्थित होते.