अहिल्यानगर – दक्षिण कोरियातील प्रतिष्ठित ११ व्या सोल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपट ब्लॉसमिंग आल्मंड (Blossoming Almond) ला बहुमान मिळाला आहे.
या चित्रपटासाठी लेखक दिग्दर्शक नेहाल एस. घोडके यांना 'बेस्ट रायटर अवॉर्ड' जाहीर झाला असून, मराठी चित्रपटसृष्टीसाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.
नेहाल घोडके यांनी लिहिलेल्या कथा, पटकथा आणि संवादांना मिळालेला हा आंतरराष्ट्रीय सन्मान संपूर्ण टीमसाठी विशेष गौरवाचा क्षण असल्याचे ते म्हणाले.
या प्रवासावर विश्वास ठेवणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. तुमच्या पाठिंब्यामुळेच हे शक्य झाले, बेस्ट रायटर हा पुरस्कार मिळणे माझ्यासाठी महत्त्वाचे होते, साधारणतः तीन वर्षे मी ही पटकथा लिहित होतो.
कदाचित त्यातील बारकावे आणि सिनेमाची शैली ही ज्युरी ना आवडली असावी, सिनेमा हे एका व्यक्तीचे माध्यम नाही, सिनेमा तयार करत असताना अनेक माणसांची साथ मिळाली.
आपला सिनेमा म्हणून त्यांनी त्यावर संस्कार केले त्यामुळेच कदाचीत हे शक्य झाले आहे, अशा शब्दात नेहाल घोडके यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
चित्रपटाची प्रमुख टीम –
लेखन व दिग्दर्शन – नेहाल एस. घोडके
पटकथा सल्लागार – अनंत काळे
छायाचित्रण – सचिन गायगोवे
संपादन – अमोल सुरुणकर
कलाकार – मनीषा मोरे, पुरुषोत्तम उपाध्याय, गरजे एन. के., जानवी लाटके, अंजली कोंडावर, रावसाहेब अलकुटे, प्रणित मेढे
अन्य सहकारी –
सहदिग्दर्शक – अमोल सुरुणकर
छायाचित्रण संचालक – सचिन गायगोवे
सहाय्यक – मयुर आहेर, कराळे शुभम, रिजवान सय्यद
लाईटिंग – सचिन गायगोवे, दिनेश सुतार, रिजवान सय्यद
वेशभूषा व मेकअप – श्रेया गायकवाड, अपूर्वा काकडे, सोनिया लोटके
ध्वनी – शुभम एम. कराळे, दिनेश सुतार
कास्टिंग टीम – निवृत्ती गरजे, पुरुषोत्तम उपाध्याय
कार्यकारी निर्माते – अमोल के. सुरुणकर, नेहाल एस. घोडके
या यशामुळे मराठी चित्रपटसृष्टीला जागतिक पातळीवर एक नवे व्यासपीठ मिळाले आहे.