दिव्यांग पुनर्वसन समितीवर रत्नाकर ठाणगे यांची निवड, जिल्हाधिकाऱ्यांकडून नियुक्ती


अहिल्यानगर - दिव्यांगासाठीच्या जिल्हा दिव्यांग पुनर्वसन समितीवर अशासकीय सदस्य म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष रत्नाकर ठाणगे यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या या समितीच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तीचे सक्षमीकरण व पुनर्वसनाचे कार्य केले जाणार आहे.

दिव्यांगाच्या कल्याणासाठी निर्धारित केलेल्या ५% निधीच्या खर्चावर देखरेख ठेवणे व दिव्यांगाच्या सर्वांगीन विकासासाठी योजनेची कार्यक्रमाची अंमलबजावणी व दिव्यांगाच्या अधिनियमातील तरतुदीची जिल्हा प्रशासनाद्वारे अंमलबजावणी योग्य होते की नाही? यावर समिती लक्ष ठेवून दिव्यांगाच्या विकासासाठी काम करत आहे.

या समितीवर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष रत्नाकर ठाणगे यांची अशासकीय सदस्यपदी नियुक्ती झाली आहे.

यापूर्वी ठाणगे अहिल्यानगर जिल्हा रेल्वे सल्लागार समितीवर यांची नियुक्ती झालेली होती. या निवडीबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

तसेच नगर पारनेरचे आमदार काशिनाथ दाते, प्रहार दिव्यांग शेळके प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण पोकळे तसेच जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांनी या निवडीबद्दल ठाणगे यांचे अभिनंदन केले आहे.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !