पोलिसांच्या बदल्यांचा मुद्दा तापला, ३ वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत अधिकारी-कर्मचाऱ्यांना तात्काळ बदला


सातारा - जिल्ह्यातील विविध पोलीस ठाणे, वाहतूक विभाग, गुन्हे शाखा, गोपनीय विभाग तसेच प्रतिबंधक विभागात ३ वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तात्काळ बदल्यांची मागणी करण्यात आली आहे.

या संदर्भातील निवेदन महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या संस्थापिका प्रतिभा सुनील शेलार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले. निवेदनात म्हटले आहे, शासनाच्या नियमावलीनुसार एका ठिकाणी सलग ३ वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत राहणे गैरप्रकारांना आमंत्रण ठरू शकते.

त्यामुळेच नियत कालावधीनंतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची बदली होणे आवश्यक आहे. दीर्घकाळ एकाच ठिकाणी कार्यरत राहिल्यास स्थानिक गुन्हेगारांशी अथवा नागरिकांशी अनावश्यक संपर्क वाढतो.

आर्थिक तडजोडी व भ्रष्टाचाराचे प्रकार घडण्याची शक्यता निर्माण होते, तसेच पोलिस दलाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहते, असेही या निवेदनात नमूद केले आहे.

त्यामुळे सर्व पोलीस ठाणे व विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या तात्काळ बदल्या करून त्यांना इतरत्र नियुक्त करण्याची, तसेच पुढील काळात यासंबंधी काटेकोर मार्गदर्शक तत्त्वे अंमलात आणण्याची मागणी करण्यात आली आहे.
Tags

buttons=(Accept !) days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !