अहिल्यानगर - विश्वकर्मा वंशीय समाज संस्था (संघटन) च्या नेवासा तालुका उपाध्यक्षपदी संचेत दिलीप प्रधान यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष प्रसाद गडकर सर यांनी नुकतीच ही निवड जाहीर केली आहे.
दि. १७ सप्टेंबर रोजी विश्वकर्मा पूजन दिनानिमित्त वेरूळ (जिल्हा संभाजीनगर) येथे आयोजित मेळाव्यात त्यांना निवडीचे पत्र प्रदान केले जाणार आहे, असे जिल्हाध्यक्ष गडकर सर यांनी सांगितले आहे.
प्रधान यांचे संघटन कौशल्य, सामाजिक जाण व समाजाविषयी असलेला सकारात्मक दृष्टीकोन लक्षात घेत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नागोराव पांचाळ, प्रदेश कार्याध्यक्ष अरुण भालेकर, सरचिटणीस संजय सुतार, नेवासा तालुकाध्यक्ष रवी मोरे, आदींनी त्यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे.
या निवडीबद्दल संस्थेच्या पदाधिकारी व मित्रपरिवाराने त्यांचे अभिनंदन केले आहे. या निवडीनंतर संघटन वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही सांगण्यात आले आहे.
समाजासाठी असलेल्या विविध योजनांसंदर्भात जनजागृती करणे, गरजूंना त्यांचा लाभ मिळवून देणे व प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी कार्यरत राहण्याची ग्वाही प्रधान यांनी दिली आहे.